आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला पटवण्याची धोकादायक योजना:घर सोडून गेलेल्या पत्नीला बोलवण्यासाठी पतीने लढवली अनोखी शक्कल; मुलीच्या गळात फास घालून पत्नीला पाठवला फोटो

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वडिलांवर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा

रागाच्या भरात गावी गेलेल्या पत्नीला बोलवण्यासाठी पतीने अनोखी शक्कल लढवली. परंतु, पत्नीला पटवण्यासाठी केलेली ही धोकादायक योजना पतीला चांगलीच महागात पडली आहे. दरम्यान, आपल्या पत्नीला विश्वास व्हावा म्हणून पतीने आपल्या मुलाला मृतांसारखे पांढरे कपडे परिधान करायला लावले.

तर आपल्या मुलीच्या गळ्यात फास घालून ते दोन्ही फोटो आपल्या पत्नीच्या व्हॉट्सअॅपवर पाठवले. आरोपीने दुसऱ्यांदा आपल्या मुलीच्या गळ्यात फास घालून लटकवत होता. दरम्यान, त्या मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. हा आवाज ऐकून शेजारी जमा झाले आणि त्यांनी त्या मुलीला वाचवले.

वडिलांवर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा
सदरील प्रकरणात शेजाऱ्यांनी कुरार पोलीस ठाण्यात या प्रकरणाची माहिती दिली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत 33 वर्षीय आरोपी सुचित गौरवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. वरिष्ठ निरीक्षक प्रकाश बेले यांनी सांगितले की, आरोपीने पत्नीला परत बोलवण्यासाठी मुलगा आणि मुलीच्या मृत्यूची खोटी कहाणी तयार केली होती. ही घटना शनिवारी घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वडिलांनी मुलांचा फोटो काढण्यासाठी कफन घातले आणि त्याच्या पुढे धूप लावली. मुलानेही त्याचे पालन केले.
वडिलांनी मुलांचा फोटो काढण्यासाठी कफन घातले आणि त्याच्या पुढे धूप लावली. मुलानेही त्याचे पालन केले.

आरोपी नशेत मुलांना करायचा मारहाण
प्रकाश बेले यांच्या मते, सुचित गौरला ड्रग्जचे व्यसन आहे. दारूच्या नशेत तो आपल्या पत्नी आणि मुलांना मारहाण करायचा. आरोपीच्या या त्रासामुळे दोन वर्षांपूर्वी पत्नी मुलांसह तिच्या गावी गेली होती. परंतु, काही दिवसांपूर्वी सुचित गावी गेला आणि मुलगा आणि मुलीला सोबत घेऊन मुंबईला आला. आरोपी नशेत असताना आपल्या मुलाला मारहाण करायचा असे शेजाऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...