आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील घटना:रस्त्यावरुन जात असलेल्या व्यक्तीला रजत बेदीच्या कारने मारली धडक, जखमींना रुग्णालयात घेऊन पोहोचला अभिनेता आणि दाखल झाला गुन्हा

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीडित व्यक्तीने नशा केल्याचा आरोप

अभिनेता रजत बेदीविरोधात मुंबईतील डीएन नगर पोलिस ठाण्यात एका व्यक्तीला त्याच्या कारने धडक दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या अंधेरी भागात ही घटना घडली. डीएन नगर पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याने स्वतः जखमी व्यक्तीला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल केले. त्याने कबूल केले की तो माणूस त्याच्या कारनेच जखमी झाला होता. सध्या पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पीडित व्यक्तीने नशा केल्याचा आरोप
रजतविरुद्ध भादंविच्या कलम 279 आणि 338 अन्वये पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्याने पोलिसांना सांगितले आहे की जखमी झालेली व्यक्ती नशेत होती आणि चुकून त्यांच्या कारसमोर आली. तो काम करुन घरी परतत होता आणि चालत्या वाहतुकीच्या दरम्यान रस्ता ओलांडताना अपघाताचा बळी ठरला. कारला धडक दिल्यानंतर त्याच्या डोक्याला कंबरेला दुखापत झाली. रजतने त्याच्या सर्व उपचारांचा संपूर्ण खर्च उचलण्याचे आश्वासन दिले आहे.

पत्नीनेही नश्याची कबुली दिली
पीडितेच्या पत्नीने देखील कबूल केले आहे की अपघात झाला तेव्हा तिचा पती नशेत होता. ती म्हणाली, 'माझे पती संध्याकाळी 6.30 वाजता घरी परतत असताना हा अपघात झाला. रजत बेदी, जो कार चालवत होता (एमएच 02 सीडी 4809) त्याने माझ्या पतीला टक्कर मारली. त्यानंतर तो पडला आणि गंभीर जखमी झाला.

या दुर्घटनेत व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्याच्यावर मुंबईतील कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या दुर्घटनेत व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्याच्यावर मुंबईतील कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रजत बेदीची फिल्मी कारकीर्द
रजत बेदीने मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली. त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1998 साली '2001' या हिंदी चित्रपटापासून केली. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, डिंपल कपाडिया आणि तब्बू मुख्य भूमिकेत होते. रजत बेदी यांनी अभिनेता म्हणून नव्हे तर खलनायक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत छाप पाडली आहे, ज्याचे प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी देखील खूप कौतुक केले.

याशिवाय, रजत 'कोई मिल गया', 'इंटरनॅशनल खिलाडी' सारख्या चित्रपटांचाही भाग राहिला आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून तो चित्रपटांपासून दूर आहे. रजत बेदी सध्या परदेशात आपला व्यवसाय करत आहे.

बातम्या आणखी आहेत...