आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईतील घटना:एका 23 वर्षीय वैद्यकीय विद्यार्थाने टिव्ही बघायला गेलेल्या 5 वर्षीय मुलीवर केला बलात्कार; खळबळ उडाल्यानंतर पोलिसांकडून आरोपीला अटक

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीडित मुलगीसह आई आणि अन्य लोकांनी पोलिस स्टेशनमध्ये गाठत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मुंबईतील जोगेश्वरी भागात गुरुवार संध्याकाळी एक घृणास्पद घटना घडली. दरम्यान, तेथीलच 23 वर्षीय रहिवाशी सुनील सखाराम गुप्ताने एका 5 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे आरोपी वैद्यकीय शाखेचा विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे. पीडित मुलगी ही त्यांच्या कुटुंबासमवेत आरोपीच्या घरी भाड्याने राहत होती. दरम्यान, पीडित मुलगी गुरुवारी संध्याकाळी टिव्ही पाहण्याकरीता आरोपीच्या घरी गेली होती. त्यावेळी आरोपीने घरातील दरवाजा आतून बंद करत पीडित मुलीसोबत घृणास्पद कृत्य केले. त्यानंतर पीडिता धावत आपल्या घरी जात आईला सगळी हकीकत सांगितली. त्यानंतर पीडित मुलगीसह आई आणि अन्य लोकांनी पोलिस स्टेशनमध्ये गाठत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी संबंधित प्रकरणाला गंभीरतेने घेत आरोपीला रात्री उशीरापर्यंत अटक केली. त्यानंतर काही वेळांनी आरोपीला स्थानिक न्यायालयाच्या कोठडीत पाठवण्यात आले होते.

स्थानिक आमदारांनी कठोर शिक्षेची मागणी केली

वर्सोवा मतदार संघाचे आमदार डॉ. भारती लावेकर यांना घटनेची माहिती मिळताच आपल्या कार्यकर्त्यांसह रात्री उशीरा पोलिस स्टेशन गाठले. दरम्यान, त्यांनी आरोपींना कठोर शिक्षेची तीव्र मागणी केली. ते म्हणाले की, अशा प्रवृतींच्या लोकांना फाशी दिली जावी. ते पुढे बोलताना म्हणाले की, हे लोक वैद्यकीय व्यवसायाला बदनाम करण्याचे काम करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...