आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत पाऊस:शहरी भागात 139 वर्षांत ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पावसाचा विक्रम, यापूर्वी 3 ऑगस्ट 1881 ला झाला होता 287 मिमी पाऊस

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुरुवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांमध्ये 331.8 मिमी पावसाची नोंद
  • यापूर्वी 3 ऑगस्ट 1881 मध्ये झाला होता 287 मिमी पाऊस

मुंबईच्या शहरी भागात ऑगस्टमध्ये 24 तासात सर्वाधिक पाऊस पडण्याचा नवा विक्रम नोंदवला गेला. प्रादेशिक हवामान केंद्रा (मुंबई) नुसार गुरुवारी सकाळी 8.30 ते गुरुवारी सकाळच्या 8.30 पर्यंत मुंबईच्या शहरी भागात331.8 मिमी आणि उपनगरी भागात 162.3 मिमी पावसाची नोंद झाली. याव्यतिरिक्त, सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 दरम्यान शहरी भागात 10.6 मिमी आणि उपनगरामध्ये 25.2 मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईच्या शहरी भागात आतापर्यंत ऑगस्ट महिन्यात 287 मिमी पेक्षा जास्त पावसाची 3 ऑगस्ट 1881 रोजी झाली होती.

विशेष म्हणजे मुंबई प्रशासकीयदृष्ट्या शहरी आणि उपनगरी भागात विभागली गेली आहे. याच कारणास्तव मुंबईच्या शहरी भागात होणाऱ्या पावसाची नोंद सांताक्रूझमधील कुलाबा व उपनगरी भागात नोंदवली गेली आहे.

शहरी भागात ऑगस्ट महिन्यात केव्हा झाला होता जास्त पाऊस

प्रादेशिक हवामान विभाग (मुंबई)नुसार कुलाबा परिसरात 10 ऑगस्ट 1998 मध्ये 261.9 मिमी, 23 ऑगस्ट 1996 मध्ये 244.2 मिमी आणि 15 ऑगस्ट 1990 मध्ये 259 मिमी पावासाची नोंद झाली आहे. तर ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पावसाचा रेकॉर्ड 3 ऑगस्ट 1881 चा आहे. या दिवशी 24 तासांमध्ये 287 मिमी पावसाचा विक्रम झाला होता. तर शहरी भागात यापेक्षाही जास्त पावसाचा विक्रम झाला आहे. मात्र तो ऑगस्ट महिन्यातला नाही. शहरी भागात 10 सप्टेंबर 1930 ला 548.1 मिमी, 5 जुलैला 1974 575.6 मिमी आणि 10 जून 1991 ला 477.6 मिमी. पावसाचा विक्रम झाला आहे.

उपनगरीय भागांमध्ये जोरदार पाऊस

मुंबईच्या पूर्व आणि उपनगरीय भागांमध्ये जोरदार पाऊस 27 जुलै 2005 नोंदवण्यात आला. या दिवशी उपनगरीय भागामध्ये 944.2 मिमी पावसाची नोंद झाली होती. या व्यतिरिक्त मुंबई उपनगरात 23 सप्टेंबर 1981 मध्ये 318.2 मिमी, 10 जून 1991 ला 399 मिमी आणि 23 ऑगस्ट 1997 ला 346.2 मिमी पावसाची नोंद झाली होती.

4 दिवसांमध्ये 1,714 कोटी लीटर पाणी पंपांमधून सोडण्यात आले

मुंबईतील पाणी साठण्याबाबत मानपाचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सांगितले की मुंबईत एकूण 6 पंपिंग स्टेशन आहेत. ज्यात एकूण 43 उच्च क्षमतेचे पंप आहेत. प्रत्येक पंपात 6 हजार लिटर पाण्याचा निचरा होण्याची क्षमता आहे. ते म्हणाले की 3 ऑगस्टच्या संध्याकाळपासून ते 6 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत या पंपावरुन 1,714.50 दशलक्ष लिटर पाणी काढले गेले. गेल्या वर्षी जुलै महिन्यात जास्त पाऊस पडल्याने मुंबईच्या मालाड भागात 18 जण ठार आणि 75 लोक जखमी झाले होते. त्यानंतर आदित्य ठाकरे (आताचे कॅबिनेट मंत्री) म्हणाले होते की आंतरराष्ट्रीय रचनानुसार 50 मिलीमीटरच्या पलीकडे पाण्याचा नाला तयार केला जाऊ शकत नाही.

प्रख्यात वास्तुविशारद चंद्रशेखर म्हणाले की, मुंबईतील पाण्याच्या ड्रेनेजची क्षमता वाढवणे आवश्यक आहे. पण यावर खर्चाची व्यवस्था मनपाने कोठून करावी? हा देखील एक मोठा प्रश्न आहे. मनपाला ऑक्ट्रॉय (जकात) मधून मिळाणार कर बंद करण्यात आला आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे जनतेला जादा कर आकारला जाऊ शकत नाही. परंतु अशा सर्व आर्थिक आणि तांत्रिक अडचणींच्या दरम्यान, मनपाने निचरा करण्याची क्षमता आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मुंबईची स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज (एसडब्ल्यूडी) व्यवस्था 100 वर्ष जुनी

मुंबईची स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज सिस्टम 100 वर्ष जुनी आहे. ते एका तासात केवळ 25 मिमी पावसाचे पाणी काढण्यास सक्षम आहे. या व्यतिरिक्त मुंबईतील 6 पंपिंग स्टेशनवर स्थापित केलेल्या 43 पंपांची क्षमता प्रति सेकंद 2.58 लाख लिटर आहे. एकंदरीत 24 तासांत 150 मि.मी.पर्यंत पाऊस पडतो तेव्हा मुंबईत एवढेच पाणी काढून टाकण्याची क्षमता आहे.

बातम्या आणखी आहेत...