आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्स रॅकेट:नायजेरियामधून ड्रग्स आणून देशातील विविध भागांमध्ये पुरवणाऱ्या हायप्रोफाइल ड्रग पेडलरला मुंबईत अटक, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजसोबत आहेत फोटोज

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनसीबीने ऑटो चालकाचा वेष धारण करुन एका नायजेरियनला पकडले

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या पथकाने मुंबईच्या मीरा रोड भागातून सूफरान नावाच्या व्यक्तीस अटक केली आहे. असा आरोप केला जात आहे की तो नायजेरियन लोकांकडून कोकेन विकत घेऊन भारताच्या विविध भागांमध्ये पुरवठा करत होता. सूफरानच्या जबाबानंतर एक नायजेरियन माणूसही पकडला गेला आहे.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे म्हणाले, 'आम्ही त्याच्याकडून कोकेन ताब्यात घेतला आणि जेव्हा त्याला पकडले गेले, तेव्हा तो मध्य प्रदेशात कोठेतरी ड्रग्स पुरवण्याच्या मार्गावर होता.' सूफरान लोखंडवाला रोडवरील हाय प्रोफाइल सोसायटीत राहतो. एनसीबीला त्याच्या मोबाईलमधून ड्रग्स ग्राहकांशी संबंधित बरीच माहिती मिळाली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोबत फोटोही त्यांच्या फोनमध्ये सापडले आहेत.

एनसीबीने ऑटो चालकाचा वेष धारण करुन एका नायजेरियनला पकडले
सूफरानच्या जबाबाच्या आधारे एनसीबीने नायजेरियन ड्रग पॅडलरला अटक केली आहे. समीर वानखेडे यांनी सांगितले की, त्यांच्या पथकाच्या एका सदस्याने ऑटो चालकाचा पोषाख परीधान करुन आरोपीला पकडले आहे. त्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांसोबत धक्काबुक्की सुरू केली, त्यानंतर स्थानिक लोकांनी त्याला पकडून जोरदारपणे मारहाण केली. हे प्रकरण इतके वाढले की त्याला वाचवण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी बोलावले गेले. झडती घेत असताना एनसीबीने त्याच्याकडून कोकेन व एमडी ड्रग्स जप्त केली आहे.

बॉलिवूड स्टार्ससोबत त्यांच्या कनेक्शनचा तपास सुरू आहे
अटक केलेल्या आरोपीचे नाव एडविन ओकेरेके असे आहे. दोघांनाही आज एनसीबीच्या विशेष न्यायालयात हजर केले असता येथून कोर्टाने त्यांना चार दिवसांच्या कोठडीत पाठवले आहे. एनसीबीने आता त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे बॉलिवूडच्या कोणत्या स्टार्सशी संबंध आहे याचा तपास करण्यास सुरुवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...