आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mumbai | Commotion Of Commuters At Nalasopara Railway Station, Sloganeering Down The Track To Demand Permission To Travel In Local Train

मुंबई:नालासोपारा रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा उद्रेक, लोकल रेल्वेने प्रवासाची परवानगी देण्याची मागणी; रेल्वे रोको करण्याचा प्रयत्न

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रवाशांनी बसगाड्या नसल्याचा आरोप करत लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी मागत होते

मुंबईतील नालासोपारा रेल्वे स्टेशनवर बुधवारी सकाळी प्रवाशांचा उद्रेक झाला. बसच्या कमतरतेमुळे प्रवासी लोकल गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्याची मागणी केली. आतापर्यंत फक्त आवश्यक सेवांशी संबंधित कर्मचार्‍यांनाच लोकल ट्रेनमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 8 वाजेच्या सुमारास हा गोंधळ झाला. नागरिकांनी रेल्वे रोकोचा प्रयत्न केला. यामुळे सुमारे अर्धा तास लोकल सेवेवर परिणाम झाला. सध्या परिस्थिती सामान्य आहे आणि प्रवाशांना रूळांवरून हटवून लोकल ट्रेन सेवा सुरु केली आहे.

लोकल ट्रेनमध्ये केवळ याच प्रवाशांना परवानगी 

लोकल ट्रेनमध्ये सध्या पोलिस कर्मचारी, डॉक्टर, नर्स, महानगर पालिकेचे कर्मचारी, सफाई कर्मचारी, नगरपालिकेचे इतर कर्मचारी आणि पत्रकारांना प्रवास करण्याची परवानगी आहे. कोरोनापूर्वी सामान्य दिवसांत मुंबईत साधारणतः 2400 लोकल गाड्या धावत होत्या. सध्या 1200 लोकांची क्षमता असलेल्या एका लोकल ट्रेनमध्ये फक्त 500 ते 700 लोक प्रवास करत आहेत. 

लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याच्या नियमात हे बदल झाले 

> सामान्य प्रवासी लोकलमध्ये प्रवास करू शकणार नाहीत. अत्यावश्यक सेवांशी संबंधित प्रवाश्यांसाठी तिकीट खिडक्या उघडल्या जातील. संबंधित कर्मचाऱ्याने सरकारी ओळखपत्र दाखवल्यासच त्याला तिकीट मिळेले.

> पासधारक तिकिटांची वैधता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचार्‍यांना त्यांच्या ओळखपत्रांद्वारे स्थानकांवर जाण्याची परवानगी दिली जाईल.

> कर्मचार्‍यांना क्यूआर कोड आधारित ई-पास दिले जातील. ड्युटीवर येणारा कर्मचारी कंटेन्ट झोनमध्ये राहतो की नाही, हे देखील तपासले जाईल. 

> सामाजिक अंतरासाठी 1200 क्षमतेच्या ट्रेनमध्ये केवळ 700 लोकांना प्रवेश देण्यात येणार आहे. रेल्वे स्थानक परिसरात 150 मीटर पर्यंत फेरीवाले आणि पार्किंगची जागा असणार नाही. आपत्कालीन सेवा म्हणून प्रत्येक स्थानकाबाहेर रुग्णवाहिका ठेवली जाईल. लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी आयकार्ड पाहिल्यानंतर तिकिटे दिली जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...