आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद:भाई जगतापांविरोधात आमदाराची थेट राहुल गांधींकडे तक्रार, सिद्दीकी यांनी पत्र लिहून व्यक्त केली नाराजी

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेस आमदार सिद्दीकी यांनी पत्राद्वारे भागी जगतापांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली.

पंजाब आणि राजस्थानात काँग्रेसमध्ये कलह सुरू आहे. दरम्यान आता मुंबईमध्येही काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधात एका आमदाराने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे. काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांच्याकडून ही तक्रार करण्यात आली आहे. झिशान सिद्दिकी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी भाई जगताप यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत.

काँग्रेस आमदार सिद्दीकी यांनी पत्राद्वारे भागी जगतापांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी आपल्याला डावलले जात असल्याचा आरोप जगताप यांच्यावर केला आहे. माझ्या पक्षाचा अध्यक्षच माझ्याविरोधात कारवाया करत असल्याचा गंभीर आरोप सिद्दिकी यांनी पत्रात केला आहे. माझ्या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला, मात्र स्थानिक आमदार असूनही मला बोलावण्यात आले नसल्याचे ते म्हणाले.

पुढे सिद्दिकी यांनी पत्रात लिहिले की, एवढेच नाही तर, काही महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये युवा काँग्रेसच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये झिशान सिद्दिकीला मदत केली तर पक्षात पद देणार नाही असंही भाई जगताप यांनी पक्षातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचा गंभीर आरोप झिशान सिद्दिकींकडून करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणामुळे आता काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

बातम्या आणखी आहेत...