आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई काँग्रेसमध्ये कलह:आमदार झिशान सिद्दिकींनी सोनिया गांधींना लिहिले पत्र, भाई जगतापांविरोधात केली तक्रार

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे. मुंबई काँग्रेस युवक विंगचे अध्यक्ष आणि आमदार झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. पत्रात त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याबद्दल तक्रार केली आहे. 14 नोव्हेंबर रोजी मुंबईतल्या एका रॅलीत या दोघांमध्ये झालेल्या गोंधळासंदर्भाने हे पत्र लिहिण्यात आले आहे.

वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात रविवारी काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारविरोधात निषेध मोर्चा काढला. यावेळी जगताप आणि सिद्दिकी याच्यात वाद झाला होता. झिशान यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रामध्ये लिहिले आहे की, मुंबईत 14 नोव्हेंबर रोजी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीदरम्यान भाई जगतापांनी माझ्यासोबत गैरवर्तणूक केली. त्यांनी माझ्या धर्माविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यांनी मला धक्काबुक्की देखील केली आणि गर्दीसमोर माझा अपमान केला. मात्र आपल्या पक्षाची प्रतिमा अबाधित राहावी यासाठी मी तेव्हा काही बोललो नाही. मात्र भाई जगताप यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जावी अशी माझी मागणी आहे. नवभारत टाइम्सकडून हे वृत्त देण्यात आले आहे.

काय झाला होता वाद?
गगनाला भिडणारी महागाई, डिझेल-पेट्रोल आणि एलपीजीच्या दिवसेंदिवस चौपट वाढणाऱ्या किमती आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारविरोधात आक्रोश मोर्चा काढला. रविवारी काढण्यात आलेल्या या मोर्चाअंतर्गत दादर येथील बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहापासून शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीपर्यंत भव्य पदयात्रा काढण्यात आली.

राजगृहाबाहेर मोदी सरकारच्या विरोधात जमलेले काँग्रेसचे नेते एकमेकांवर भिडले. मिळालेल्या माहितीनुसार, राजगृहात जाण्यावरून मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार झिशान सिद्दीकी, युवा नेते सूरज सिंह ठाकूर यांच्यात वाद झाला. झिशान सिद्दीकी यांना आत प्रवेश दिला नाही. फक्त दहा जणांना आत प्रवेश दिला जात असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वादाचे आणखी एक कारण समोर आले.ज्या ट्रकवर ज्येष्ठ नेते उपस्थित होते, त्या ट्रकवर चढण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे संतापलेले झिशान सिद्दीकी पदयात्रा अर्धवट सोडून निघून गेले. बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यापासून रोखण्यात आल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...