आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसमध्ये कलह:मुंबई काँग्रेस अध्यक्षांच्या 'भाईगिरी'विरोधात उठवला जातोय आवाज,  AICC चे सदस्य विश्वबंधू यांनी केले गंभीर आरोप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई कॉंग्रेसच्या नवीन समितीमध्ये बड्या नेत्यांची ही पदे 'या' लोकांना दिली आहेत

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या 'भाईगिरी'विरोधातील सूर उमटण्यास सुरवात झाली आहे. AICC चे सदस्य विश्वबंधू राय यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून भाई जगताप यांच्यावर मनमानी करण्यासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणतात की वाईट काळात कॉंग्रेसला पाठिंबा देणार्‍या मुस्लिम आणि उत्तर भारतीय समाजातील कोणत्याही व्यक्तीला जिल्हाध्यक्ष केले गेले नाही.

राय यांनी आरोप केला आहे की भाई जगताप यांनी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सचिव सदानंद भिकाजी चव्हाण यांना मुंबई कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि पुतणे अनंत बबन जाधव यांना सचिव म्हणून नियुक्त केले आहे. कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी त्यांचे व्याही अब्दुल अहाब खान यांना सरचिटणीस म्हणून नियुक्त केले आहे. मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार संजय निरुपम यांनीही वाहत्या गंगेत हात धूत आपला भाऊ अंजय ब्रिजकिशोरलाल श्रीवास्तव यांना सरचिटणीस केले आहे. निरुपम समर्थक जयप्रकाश काशिनाथ सिंह यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर जयप्रकाश सिंह यांनी जुगाड लावत त्यांचा मुलगा धीरज सिंग यांना सरचिटणीस म्हणून नियुक्त केले.

के. सी. वेणुगोपाल यांची चलती आणि मुस्लिमांना दाखवली वाट
मुंबई कॉंग्रेसच्या नवीन संघात दाखवण्यासाठी काही मुस्लिम समाजातील लोकांची नेमणूक करण्यात आली आहे, परंतु कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार के.सी. वेणुगोपाल यांचे एवढी चलती आहे की, त्यांनी तीन दक्षिण भाषिकांना जिल्हाध्यक्ष बनवून मुंबई मनपा निवडणुकीत पक्षाला पराभूत करण्याचा श्रीगणेशा केला आहे. सुरु केले. वेणुगोपाल यांच्यामुळे उत्तर पूर्वमध्ये दक्षिण भाषिक अब्राहम रोयमानी, उत्तर-मध्य मुंबईत जगदीश कुट्टी अमीन आणि उत्तर-पश्चिमेत क्लायव्ह डायस यांना जिल्हा-अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे.

मुंबई कॉंग्रेसच्या नवीन समितीमध्ये बड्या नेत्यांची ही पदे 'या' लोकांना दिली आहेत
माजी कॅबिनेट मंत्री नसीम खान यांचे बंधू मोहम्मद शरीफ खान यांना उपाध्यक्ष आणि माजी मंत्री सुरेश शेट्टी यांचे पीए संतोष केशव बागवे यांना सचिव करण्यात आले. तसेच उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक मोहसीन हैदर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्यांची पत्नी नगरसेवक असून मुलगा यूथ काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष आहे. प्रणिल नायर यांचे नशीब वाईट ठरले. काही वर्षांपूर्वी त्यांना उत्तर-पूर्व जिल्हाध्यक्ष बनवण्यात आले होते, परंतु त्यांना काढून उपाध्यक्ष बनवण्यात आले. तसेच, मुंबई मनपामध्ये विरोधी पक्षनेते असलेले ज्ञानराज निकम यांना सचिव करून त्यांचा अपमान करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...