आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:मुंबईतून 100 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण झाले बेपत्ता, खोटी माहिती दिल्याने सापडेनात

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आधार व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी मदत, धारावीतील २९ जणांचा समावेश

मुंबई शहर कोरोना रुग्णांचा हाॅटस्पाॅट ठरला असून शहरातील कोरोना रुग्णाची संख्या २१ हजाराच्या पुढे गेली आहे. अशातच काेरोना पाॅझिटिव्ह असलले १०० पेक्षा अधिक रुग्ण सापडत नसल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाचे धाबे दणाणले असून या गायब रुग्णांना शोधण्यासाठी पालिकेने मोहीम हाती घेतली आहे.

कोरोनाची सौम्य लक्षणे असताना रुग्ण दवाखान्यात येतो. तेव्हा त्याची स्त्राव चाचणी घेतली जाते. अशी चाचणी बऱ्याचदा खासगी लॅबमध्ये होते. चाचणीच्या वेळी संशयितांचा पत्ता व संपर्कासह सर्व माहिती घेतली जाते. पण, अनेकदा संशयित जाणीवपूर्वक खोटी माहिती देतात किंवा माहिती लिहून घेताना चूक होते.

रुग्णाची चाचणी जेव्हा पाॅझिटिव्ह येते, तेव्हा संबंधित पालिकेकडून संपर्क केला जातो. मात्र संबंधिताने आपला संपर्क क्रमांक चुकीचा दिला असल्याने त्याच्यापर्यंत पोचणे अवघड जाते. मग, पालिकेचे कर्मचारी त्याच्या राहण्याच्या ठिकाणी पोचतात. मात्र निवासाची माहिती अपुरी असते. त्यामुळे अखेर संशयित काही सापडत नाही.

बहुतेक अशा चुका खासगी लॅबमध्ये चाचणी घेताना झाल्या आहेत. पालिकेने त्यासाठी लॅबमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे ठरवले आहे. किंवा अाधार कार्डवरुन माहिती मिळवण्याचा प्रयत्न चालवला आहे. तसेच संबंधित व्यक्ती ज्या कंपनीत काम करत होता, तेथे संपर्क केला जात आहे. मात्र, अजून हे रुग्ण सापडत नाहीत.]

धारावीतील २९ जणांचा आहे समावेश

अशा प्रकारे धारावीत २९, अंधेरीत २७ आणि विक्रोळीत १२ पाॅझिटिव्ह रुग्ण गायब आहेत. पालिकेने एका रुग्णाच्या मागे ट्रेसिंगसाठी ६ मनुष्यबळ लावले आहे. या गायब कोरोना रुग्णांना शोधण्यात जेवढा विलंब होईल, तितका या रुग्णांकडून कोरेनाचा प्रादुर्भाव वाढणार आहे.

बातम्या आणखी आहेत...