आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद, नांदेड, बुलडाणा, सातारा आणि सांगलीमध्ये कोरोना रुग्णांवर निगराणी आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाला आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ तैनात करण्यात आलेले नाही, असा ठपका केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ठेवला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये चाचणी करण्यास विरोध, संसर्ग झाल्यानंतरही लोक रुग्णालयात भरती होण्यास टाळाटाळ करीत असल्याने परिस्थिती बिकट होत अाहे. औरंगाबाद, जालन्यासह ७ जिल्ह्यांमध्ये अारोग्य कर्मचाऱ्यांचा प्रचंड तुटवडा असल्याचे अहवालात म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये आपली पथके पाठवली अाहेत. या पथकांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती तसेच आरोग्य यंत्रणेबाबतची माहिती पाठवल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा अहवाल राज्याचे आरोग्य प्रधान सचिव प्रदीप व्यास यांना पाठवला आहे. भंडारा जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्राबाहेरच अधिक रुग्ण आढळून आल्याचे केंद्रीय पथकाच्या निदर्शनास आले. तर औरंगाबाद, अहमदनगर, नंदुरबार आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये रुग्णालयातील उपलब्ध बेड्सपेक्षाही अधिक रुग्ण असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
विविध जिल्ह्यांमध्ये आलेले अनुभव
तत्काळ आरोग्य सेवकांची भरती आवश्यक
औरंगाबाद, जालना, जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, सातारा, पालघर या ७ जिल्ह्यांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा असून या जिल्ह्यांमध्ये कंत्राटी अारोग्यसेवक, कर्मचाऱ्यांची तातडीने भरती होणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. सातारा आणि नगर जिल्ह्यामध्ये पुरेसे मनुष्यबळ नसल्याने रुग्णांची माहिती, आकडेवारी गोळा करण्यातही अडचणी येतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.