आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील रूग्णसंख्या पुन्हा 20 हजार पार:गेल्या 24 तासांत 20 हजार 971 नवे रुग्ण, 6 जणांचा मृत्यू; 8 हजार 490 रुग्ण कोरोनामुक्त

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील कोरोना रूग्णसंख्येमध्ये भर पडत असल्यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे. शुक्रवारी दिवसभरात मुंबईत 20 हजार 971 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर सहा जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 8 हजार 490 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईत गुरुवारी 20, 181 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली होती. तर चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

दरम्यान, सध्या मुंबईत 91 हजार 731 सक्रीय रुग्ण असून, मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 64 हजार 53 वर पोहोचली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्क्यांवर गेला आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 16 हजार 394 इतकी झाली आहे.

मुंबईतून मंजूरांचे पलायन

कोरोनाच्या पहिल्या लाटेत अचानक लॉकडाऊन लागल्यानंतर मोठ्या शहरांमधून घरी परतणाऱ्या स्थलांतरितांचे हृदयपिळवटून टाकणारे फोटोज आपण सर्वांनी पाहिले आहेत. महामारीच्या तिसऱ्या लाटेत पुन्हा एकदा असेच दृश्य पाहायला मिळत आहे. मुंबईत लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय मजुरांनी रेल्वे स्थानकावर तळ ठोकला आहे. लॉकडाऊनच्या आधी आपापल्या गावात आणि घरापर्यंत पोहोचायला हवे असा सर्वांचा प्रयत्न आहे.

बातम्या आणखी आहेत...