आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:मास्क न घातल्याचे कारण विचारल्यामुळे टोळक्याकडून दोन भावांवर चाकू आणि तलवारीने जीवघेणा हल्ला

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गंभीर जखमी झालेल्या दोन भावांना राजवाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे

शहरातील तिलळ नगर परिसरात मास्क न  घातल्याची विचारणा केल्यामुळे एका व्यक्तीच्या दोन भावांवर टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सध्या दोन्ही जखमींना राजवाडी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले असून, फरार आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, रविवारी मास्क न घालता आणि सोशल डिस्टेनसिंगचे पालन न करता भाजी विकत घेत होते.  यावर नवनीत राणा नावाच्या व्यक्तीने त्यांना जाब विचारला. यादरम्यान त्यांच्या वाद झाला आणि नवनीत यांना त्या टोळक्याने मारहाण केली. यावेळी त्यांचे भांडण सोडवण्यात आले. पण, नंतर रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास हेच टोळके नवनीत राणा यांच्या घरी त्यांना मारण्यासाठी गेले. पण, नवनीत घरी नव्हता. यावेळी त्यांच्या दोन भावांवर या टोळक्याने हल्ला चढवला आणि चाकू आणि तलवारीचे वार केले. या घटनेनंतर दोन्ही भावांना राजवाडी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...