आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे दिसत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरणावर भर देण्यात आला होता. मात्र लशीचा साधा संपल्यामुळे काही काळासाठी लसीकरण हे थांबले होते. अखेर बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोविड-19 लस साठा उपलब्ध झाला आहे. आज 71 पैकी 62 खासगी रुग्णालयात कोविड लसीकरण पुन्हा सुरू केले जाणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोविड-19 च्या लसीची नवी खेप उपलब्ध केल्यानंतर नंतर शहरात 12 एप्रिल आजपासून 71 पैकी 62 खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण पुन्हा एकदा सुरू होईल. बीएमसी आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले की, 49 सरकारी केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. मुंबईमध्ये दररोज जवळपास 40 ते 50 हजार लोकांना लस दिली जात आहे. खासगी लसीकरण केंद्रांमध्ये लशीच्या कमतरतेमुळे 10 आणि 11 एप्रिलला लसीकरण बंद होते. मात्र आता सोमवारपासून (आज) हे लसीकरण सुरू झाले आहे.
मुंबईच्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहणार कोरोना रुग्ण
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता बीएमसी आता 5 स्टार हॉटलच्या 600 खोल्या आपल्या कस्टडीमध्ये घेत आहे. या खोल्यांमध्ये अशा रुग्णांना ठेवले जाईल, जे उपचारांच्या 10 दिवसांनंतरही पॉझिटिव्ह आहेत. ज्यांचे ऑक्सीजन लेव्हल सामन्य आहे आणि ताप नाही. या रुग्णांच्या देखरेखीची जबाबदारी खासगी रुग्णालयांची असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.