आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mumbai Corona Virus Cases Update | Maharashtra Mumbai Coronavirus Cases Update Vs COVID 19 Cases In India State Wise Death Toll Rajasthan Haryana Madhya Pradesh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई कोरोना:29 राज्यातील एकूण कोरोना संक्रमित 33 हजार, तर एकट्या मुंबईत 34 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईत जितके मृत्यू झाले, तितके 30 राज्यात झाले नाही

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सध्या सर्वात जास्त कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. 27 मे पर्यंत शङरात 34 हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत, तर संपूर्ण महाराष्ट्रात 59 हजार 546 रुग्ण आहेत. म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रात जितके रुग्ण आहेत, त्याच्या 60%  रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. मुंबई व्यतिरिक्त महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यात 22 हजार 930 रुग्ण आहेत.

याशिवाय, देशातील 29 राज्यांना मिळून तितके रुग्ण होत नाहीत, तितके एकट्या मुंबईत आहेत. देशातील 29 राज्यात 33 हजार 92 रुग्ण आहेत. तसेच, देशातील 30 राज्यांतील एकूण मृतांचा आकडा 1 हजार 87 आहे. तर, एकट्या मुंबईत  1 हजार 97 मृत्यू झाले आहेत.

27 दिवसात देशात 371% रुग्ण वाढले, तर मुंबईत 382% 

मे महिन्यात कोरोना संक्रमणाचा वेग खूप वाढला. 30 एप्रिलपर्यंत देशात 33 हजार 610 रुग्ण होते. त्यानंतर 28 मे पर्यंत रुग्ण 371% वाढून 1 लाख 59 हजार 546 झाले. तर, मुंबईत मे महिन्यात कोरोनाचा वेग देशाच्या तुलनेत 10% जास्त होता. मुंबईत 30 एप्रिलपर्यंत 7 हजार 61 रुग्ण होते, 27 मे पर्यंत 34 हजार 18 रुग्ण झाले. 

मुंबईत किती कोव्हिड रुग्णालये ?

आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांच्या आरोग्य सुविधांना तीन कॅटेगरीमध्ये विभाजीत केले आहे

-पहिल्या कॅटेगरीमध्ये डेडिकेटेड कोव्हिड रुग्णालय आहेत, त्यात गंभीर आजारी रुग्णांवर उपचार सुरू आहे.

-दुसऱ्या कॅटेगरी कोव्हिड हेल्थ सेंटर आहेत, त्यात कमी गंभीर रुग्णांना उपचार दिला जातो.

-तिसऱ्या कॅटेगरीमध्ये कोव्हिड केअर सेंटर आहेत, त्यात कमी लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केला जातो.

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानुसार, राज्यात एकूण 276 कोव्हिड रुग्णालय, 453 कोव्हिड हेल्थ सेंटर आणि 1,643 कोव्हिड केअर सेंटर आहेत. यातील मुंबईत 41 कोव्हिड रुग्णालय, 25 कोव्हिड हेल्थ सेंटर आणि 463 कोव्हिड केअर सेंटर आहेत. तसेच, मुंबईतील 41 कोव्हिड रुग्णालयात 6 हजार 420 आयसोलेशन बेड आहेत, ज्यातून 5 हजार 20 बेड कन्फर्म केस आणि 1 हजार 400 बेड सस्पेक्टेड रुग्णांसाठी आहेत. आयसोलेशन बेडसोबतच 3 हजार 309 ऑक्सीजन सपोर्ट, 865 आयसीयू बेड आणि 353 वेंटिलेटर आहेत.

मुंबईत संक्रमण वेगाने पसरण्याची कारणे ?

-पहिला कारण : मुंबई, जगातिल सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. येथे अंदाजे 1.5 कोटी लोक 600 स्क्वेअर किमी परिसरात राहतात. येथे दर एक किमी परिसरात 32 हजारांपेक्षा जास्त लोक राहतात.

-दुसरा कारण : आर्थिक राजधानी असल्यामुळे ऑफीसच्या कामामुळे परदेशी नागरिकांचे मुंबईत येणे जाणे असते. मुंबईतील लोकही परदेशात जात असतात. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, मार्च-एप्रिलमध्ये मुंबई एअरपोर्टवर 4.79 लाख आंतरराष्ट्रीय आणि 16.71 लाख देशातील नागरिकांची मुव्हमेंट होती.

-तिसरे कारण : मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण 6 मार्चला सापडला होता. यानंतर 17 मार्चपासून शहरात काही प्रमाणात लॉकडाउन करण्यात आले. परंतू, लोकल ट्रेन आणि बस सेवा सुरू होती. सरकारच्या अपीलनंतरही लोक गर्दी करू लागले. 

बातम्या आणखी आहेत...