आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:एका महिन्याच्या चिमुकल्याची कोरोनावर मात, डॉक्टर आणि परिचारिकांनी टाळ्या वाजवत रुग्णालयातून दिला निरोप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिपोर्ट्सनुसार, कोरोनामुक्त होणारा हा देशातील सर्वात लहान रुग्ण

मुंबईत मागील 24 तासांत कोरोनाच्या 1,044 नव्या रुग्णांची नोंद झाली. येथील एकूण रुग्णसंख्या 33,835 झाली आहे. यादरम्यान मंगळवारी येथून एक दिसालादायक बातमी समोर आली आहे. एक महिन्याच्या मुलाने कोरोनावर मात केली असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात चिमुकल्याला घरी पाठवले. 

देशातील सर्वात कमी वयाचा रुग्ण

रिपोर्ट्सनुसार, कोरोनामुक्त होणारा हा देशातील सर्वात कमी वयाचा रुग्ण आहे. मुलाची आई मुलाला घेऊन जनरल वॉर्डमधून बाहेर आली तेव्हा तेथे उपस्थित रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला आणि टाळ्या वाजवून अभिवादन केले. यापूर्वी इंदूरमध्ये दोन महिन्यांच्या चिमुकलीने कोरोनावर मात केली होती. 

मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीट केला व्हिडिओ 

सीएम ऑफिसने मुलाच्या डिस्चार्जचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत लिहिले की, कोरोनाशी लढा देताना महाराष्ट्रातील लोकांची कोणतीही वयोमर्यादा राहत नाही.

सीएम ऑफिसचे ट्वीट...

बातम्या आणखी आहेत...