आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत कोरोनाची दहशत:घाटकोपरमध्ये क्वारंटाइन सेंटरच्या विरोधात रस्त्यावर उतरले स्थानिक लोक, पोलिस आणि बीएमसीच्या हस्तक्षेपानंतर मिटले प्रकरण

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
लोकांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली - Divya Marathi
लोकांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली
  • सोसायटी समोरच्या इमारतीत उभारलेल्या या क्वारंटाइन सेंटरमध्ये 150 बेड्सची सुविधा

मुंबईतील घाटकोपरमध्ये क्वारंटाइन सेंटर बनवण्याच्या विरोधात स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. परिसरात क्वारंटाइन सेंटर उभारत असल्याची माहिती मिळाल्यानंतर लोक सोमवारी रात्री उशिरा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आणि गदारोळ घातला. काही वेळाने बीएमसी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण मिटविण्यात आले आणि लोकांना घरी परत पाठवले.

पोलिसांनी सांगितले की, घाटकोपरमध्ये काही हाउसिंग सोसायटीतील लोक सोमवारी रस्त्यावर उतरले होते, कोमा लेन भागात कोरोनाग्रस्तांसाठी बांधण्यात येणारे क्वारंटाइन सेंटर तेथून हटवाण्याची त्यांची मागणी होती. 

क्वारंटाइन सेंटरमध्ये 150 बेड्सची सुविधा

हाउसिंग सोसायटीच्या समोरच्या इमारतीत तयार करण्यात आलेल्या या क्वारंटाइन सेंटरमध्ये 100 बेड्सची सुविधा आहे. आपल्या मागण्यांसाठी अनेक रहिवासी संध्याकाळी घराबाहेर रस्त्यावर आले.  भाजपा स्थानिक एम.एल. पराग शाह म्हणाले, "लोकांनी एकमेकांना मदत करावी अशावेळी चार ते पाच निवासी सोसायटीतील सदस्यांनी त्याला विरोध केला."

मुंबईत आतापर्यंत 21 हजाराहून अधिक संक्रमित रुग्ण 

मुंबईत मंगळवारी सकाळपर्यंत 1 हजार 185 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 23 रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे 757 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 21 हजार 152 लोक कोरोनाबाधित आहेत. दरम्यान 504 लोकांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. मुंबईत आतापर्यंत 5 हजार 516 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...