आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:कोरोना संक्रमित रुग्णाने डॉक्टरवर लावले लैंगिक शोषणाचे आरोप, गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपीला केले होम क्वारेंटाइन

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याप्रकरणी एका 44 वर्षीय पीडित पुरुषाच्या तक्रारीनंतर 34 वर्षीय डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला आहे

कोरोना व्हायरसच्या उपचाराशी निगडीत एका डॉक्टरवर लैंगिक शोषणाचे आरोप लागले आहे. प्रकरण मुंबईतील एका चर्चित हॉस्पिटलमधले आहे. पीडित एक 44 वर्षीय पुरुष आहे. याप्रकरणी 34 वर्षीय डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीदेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा पोलिसांना संशय आहे, त्यामुळे आरोपी डॉक्टरला होम क्वारेंटाइन करण्यात आले आहे.

आयसीयू वॉर्डात शोषण केल्याचा पीडितचा रुग्णाचा आरोप

पीडित रुग्णाकडून दाखल केलेल्या एफआयआरनुसार, 1 मे रोजी सकाळी आरोपी डॉक्टर 10 व्या मजल्यावरील आयसीयू वॉर्डात दाखल झाला. आत येताच आरीपोने रुग्णाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर सेक्सुअली असॉल्ट केले. रुग्णाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने ऐकले नाही. त्यानंतर रुग्णाने अलार्म वाजवला आणि तो ऐकुन हॉस्पीटलचे कर्मचारी आत दाखल झाले, त्यानंतर डॉक्टराने रुग्णाला सोडले. पीडित्याच्या सांगण्यावरुन डॉक्टरविरुद्ध आयपीसी कलम 377, 269 आणि 270 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

हॉस्पिटलने आरोपी डॉक्टरला निलंबीत केले

प्रकरण समोर आल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने आरोपी डॉक्टरला निलंबीत केले आहे. हॉस्पिटल प्रशासनाने सांगितल्यानुसार, डॉक्टर एका दिवसापूर्वीच जॉइन झाला होता. डॉक्टरने नवी मुंबईतील एक कॉलेजमधून एमडीचे शिक्षण घेतले आहे. यानंतर 28-29 एप्रिलला हॉस्पिटलमध्ये इंटरव्ह्यू झाला आणि 30 एप्रिलपासून डॉक्टर जॉइन झाला.

बातम्या आणखी आहेत...