आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकांदिवली परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीत राहणारे बरेच लोक लसीकरणाच्या घोटाळ्यात सापडले आहेत. त्यांचा आरोप आहे की काही लोक मुंबईतील नामांकित रुग्णालयाचे कर्मचारी म्हणून आले आणि त्यांना बनावट कोविड -19 इंजेक्शन्स दिली गेली. सोसायटीच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. लसीकरणानंतर कोणत्याही व्यक्तीला ताप किंवा थकव्याची लक्षणे दिसले नाहीत यामुळे त्यांना संशय आला.
सोसायटीमध्ये राहणारे हितेश पटेल म्हणाले की, 30 मे रोजी हिरानंदानी हाउसिंग सोसायटीच्या आवारात 390 लोकांना कोवीशील्ड लस देण्यात आली होती. प्रत्येक डोससाठी 1,260 रुपये आकारले गेले. सोसायटीने एकूण 4 लाख 91 हजार 400 रुपये भरले. त्यांनी सांगितले की, राजेश पांडे नावाच्या एका व्यक्तीने स्वतःला कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाचे प्रतिनिधी असल्याचे सांगत सोसायटी कमिटीच्या सदस्यांसोबत संपर्क साधला होता. या अभियानाचे संचालन संजय गुप्तांनी केले, तर महेंद्र सिंह नावाच्या व्यक्तीने सोसायटीच्या सदस्यांकडून पैसे घेतले होते.
मॅसेजही आला नाही आणि फोटोही घेऊ दिला नाही
पाटील पुढे म्हणाले की, लस घेतल्यानंतर आम्हाला आमच्या मोबाइलवर कोणत्याही प्रकारचा मेसेज आला नाही. या व्यतिरिक्त, आम्हाला लस घेताना सेल्फी किंवा फोटो घेण्यास परवानगी नव्हती. सोसायटीचे आणखी एक सदस्य ऋषभ कामदार म्हणाले की, लस घेतल्यानंतर कोणालाही रिसीव्ड किंवा प्रमाणपत्रही देण्यात आले नाही. 10-15 दिवसांनंतर प्रमाणपत्र आले तर ते वेगवेगळ्या रुग्णालय जसे की, नानावटी, लाइफ लाइन, नेस्को बीएमसी लसीकरण केंद्राकडून जारी करण्यात आले होते. या प्रकरणी संबंधीत रुग्णालयांशी संपर्क केला तर त्यांनी सोसायटीला लसी उपलब्ध करण्यापासून नकार दिला.
आरोपीसध्या बेपत्ता
वरीष्ठ पोलिस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे, ते सध्या बेपत्ता आहेत. नानावटी रुग्णालयाचे प्रवक्ता यांनी सांगितले की, त्यांच्या रुग्णालयाकडून या सोसायटीमध्ये कोणताही कँप आयोजित करण्यात आलेला नाही. रुग्णालयाने या संबंधी विभागांना सूचितही केले आहे आणि लवकरच पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही केली जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.