आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा(मनीषा भल्ला)
येथील सायन हॉस्पिटलमधील भयावह चित्र समोर आले आहे. येथे कोरोना रूग्णांसोबतचा निष्काळजीपणा समोर आला आहे. रुग्णालयातील आपत्कालीन विभागात कोरोनाबाधित रुग्णांच्या शेजारी याच आजारामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा मृतदेह ठेवले जात आहेत. याबाबत रुग्ण बऱ्याच दिवसांपासून तक्रारी करत होते, पण आता एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब समोर आली आहे. रुग्णांचे असेही म्हणणे आहे की, सध्या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले मृतदेह याआधी असेच पडलेले होते.
व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, रुग्णालयाच्या वार्डात अनेक रुग्ण बेडवर आहेत. या रुग्णांशेजारी प्लास्टिकच्या बॅगेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचे मृतदेह देकील वॉर्डातील बेडवर ठेवले आहेत. काही मृतदेहांना कपड्यांनी तर काही ब्लँकटेने झाकले आहे. वॉर्डात कोरोना बाधिक रुग्णांशेजारी असे 19 मृतदेह पडले होते.
रुग्णालयाने दिले स्पष्टीकरण
व्हिडिओ समोर आल्यानंतर रुग्णालयाचे डीन डॉ. प्रमोद इंगळे यांनी कबूल केले आहे की व्हिडिओ त्यांच्या रूग्णालयाचा आहे. डॉक्टर इंगळे यांच्या म्हणण्यानुसार रुग्णालयात कर्मचार्यांची कमतरता आहे. त्यातही नातेवाईक मृतदेह आणण्यासाठी येत नाहीत. म्हणून आम्ही त्यांना तिथे ठेवले. शवगृहात असलेल्या 15 शेल्पपैकी 11 भरलेले आहेत. जर उर्वरित मृतदेह तिथे नेले तर ज्यांच्या सदस्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नाही अशा कुटुंबांना त्रास होईल.
नितेश राणेंचे ट्वीट
भाजप नेता नितेश राणे यांनी देखील व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यांनी लिहिले की, 'सायल रुग्णालयात रुग्ण मृतदेहांसोबत झोपत आहेत. असे कसे प्रशासन आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.'
माजी मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईची मागणी केली
या घटनेबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'सायन हॉस्पिटल मधली घटना अत्यंत गंभीर आहे. प्रेतांच्या बाजूला रुग्णांना उपचार घ्यावे लागावे ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुंबईकरांचा कोणीच वाली नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने तात्काळ लक्ष घालावे व अशी घटना पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.'
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.