आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनात फसवणूक:नवी मुंबईत वापरलेले हातमोजे धुवून पुन्हा विकणाऱ्याला पकडले, 3 टन म्हणजेच 4 लाख ग्लोव्स जप्त, एका आरोपीला अटक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी नवी मुंबई एमायडीसीच्या एका फॅक्ट्रीवर छापा मारला तेव्हा या ग्लोव्ह्सची पॅकिंग केली जात होती
  • ​​​​​नीळ्या रंगाच्या या लेटेक्स ग्लोव्ह्सचा वापर सामान्यतः डॉक्टर आणि नर्स हे रुग्णांवर उपचार करताना करतात

कोरोना संसर्गाच्या या काळात नवी मुंबईत वापरलेले हँड ग्लोव्स विकणाऱ्या टोळीचा पुन्हा पर्दाफाश केला. या प्रकरणात आतापर्यंत गुन्हे शाखेने एकास अटक केली असून डझनभराहून अधिक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या कारखान्यावर छापा मारत पोलिसांनी तीन टन म्हणजे 4 लाख वापरलेले ग्लोव्स जप्त केले आहेत.

पोलिसांच्या पथकाने नवी मुंबई एमआयडीसीमधील एका कारखान्यावर छापा टाकला असता, हे हँड ग्लोव्स धुण्याचे आणि पॅकिंग करण्याचे काम चालू होते. या निळ्या रंगाच्या लेटेक्स हातमोज्यांचा वापर सामान्यत: डॉक्टर आणि परिचारिका रूग्णाच्या उपचारादरम्यान वापरतात.

पुस्तक छपाई कारखान्यात सुरू होता हा गोरखधंदा
शहरातील एमआयडीसी भागातील गामी औद्योगिक पार्क येथे एका गोदामावर छापा टाकण्यात आला, अशी माहिती मुंबई पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष निकम यांनी दिली. येथे पुस्तकांची छपाई केली जाते. याप्रकरणी कारखान्याचे मालक प्रशांत सुर्वे यांना अटक करण्यात आली आहे.

निकम म्हणाले की, आरोपी हातमोजे साफ करण्यासाठी वॉशिंग मशीन वापरत होता आणि ते कोरडे करण्यासाठी ब्लोअरचा वापर केला जात होता. ते म्हणाले की जप्त केलेल्या वस्तूंची किंमत 6 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

बरीच रुग्णालये या टोळीशी संबंधित असल्याचा संशय आहे

पोलिसांनी सांगितले की, आरोपींकडे सापडलेल्या लेटेक्स ग्लोव्सचे प्रमाण बघून असे दिसून येते की ते हॉस्पिटलमधून खरेदी केले गेले आहेत. या प्रकरणात चौकशी सुरू आहे आणि काही रुग्णालयेही या प्रकरणात सामिल असू शकतात. हातमोजे साफ करण्यासाठी वापरले जाणारे केमिकलही मोठ्या प्रमाणात सापडले आहे.

आतापर्यंत हे कोणाला विकले आहेत याची विचारपूस पोलिस करत आहेत. त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 270 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...