आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:सर्वसामान्यांना दंडाच्या नावाखाली लुटणाऱ्या सहा क्लीनअप मार्शलला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो) - Divya Marathi
(फाईल फोटो)
  • वाहनचालकांकडून हे क्लीनअप मार्शल 2-3 हजार रूपये दंड आकारत होते.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी मुंबई महानगरपालिकेने क्लीनअप मार्शल यांची नियुक्ती केली आहे. मात्र या मार्शल विरोधात सातत्याने नागरिक तक्रारी करत असतात. लोकांकडून दंडाच्या नावाखाली भरमसाठ पैसा उकळणाऱ्या एका क्लीनअप मार्शलच्या टोळीला पोलीसांनी अटक केली आहे. रस्त्यावर थुंकल्याचे अथवा मास्क न लावल्याचे कारण सांगत वाहनचालकांकडून तब्बल 2 ते 3 हजार दंड आकारणाऱ्या या सहा क्लीनअप मार्शलला मुंबई पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे.

मुंबईतून नवी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर म्हणजेच ऐरोली टोलनाक्या जवळ हे क्लीनअप मार्शल दंड आकारण्याचे काम करत होते. या मार्गावरून येणाऱ्या वाहनचालकांकडून हे क्लीनअप मार्शल 2-3 हजार रूपये दंड आकारत होते. पोलीसांनी ह्या टोळीला अटक केल्यानंतर यांच्याकडून काही रोख रक्कम देखील ताब्यात घेण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या नावाखाली अनेक दिवसांपासून अशीच लुट सूरू असल्याची तक्रार नागरिकांनी व वाहनाचालकांनी नवघर पोलीस स्टेशन दिली. त्यामुळे संबंधित घटनेची दखत घेत पोलिसांनी घटनास्थळावर छापा टाकत सहा जणांना अटक केली. दरम्यान, क्लीनअप मार्शलकडून मुंबई महानगरपालिकेच्या दंड रक्कम वसूलीची पावतीच फाडत नसल्याचे देखील समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...