आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बोरीवलीच्या शताब्दी रुग्णालया्या एका कोरोना संक्रमित महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या मुलाला कोणत्याही सुरक्षा किट शिवाय त्याच्या आईचा मृतदेह प्लास्टिक बॅगमध्ये टाकण्यास भाग पाटले. या घटनेची गंभीर दखल घेत असे करणाऱ्या दोन मेडिकल स्टाफला सस्पेंड करण्यात आले आहे. रुग्णालयाचने या प्रकरणी एक चौकशी समितीही स्थापन केली आहे.
मुंबईत 85 हजाराहून अधिक संक्रमित रुग्ण आहेत. दरम्यान मृतदेहांबाबत रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षाच्या बर्याच घटना गेल्या काही दिवसांत उघडकीस आल्या आहेत. अगदी मुंबई उच्च न्यायालयानेही राज्यातील ठाकरे सरकारला समन्स बजावले होते.
30 जून रोजी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर केले होते रुग्णालयात दाखल
50 वर्षांच्या पल्लवी उतेकर या घरकाम करतात. त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले. यानंतर त्यांना 30 जून रोजी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 2 जुलै रोजी त्यांचा मुलगा कुणाल यांना हॉस्पिटलचा फोन आला आणि लवकरात लवकर रुग्णालयात येण्यास सांगण्यात आले.
इस्पितळात पोहोचल्यावर कुणालला त्याच्या आईचे निधन झाल्याचे सांगण्यात आले आणि त्यांनी त्याला मृतदेह बॅगमध्ये ठेवून घेऊन जाण्यास सांगितले. कुणाल यांनी पीपीई किटची मागणी केली असता त्यांची मागणी नाकारली गेली. इतकेच नाही तर कोविड वॉर्डमध्ये कोणत्याही सुरक्षेशिवाय तो गेला आणि त्याने आपल्या आईचा मृतदेह बॅगमध्ये पॅक केला.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पीपीई किट देण्यास नकार दिला
रुग्णालयावर आरोप करत कुणालने सांगितले की,, "मला पीपीई किट नाकारले तेव्हा मला धक्का बसला." कुणाल म्हणाला, 'मी त्यांना सांगितले की पीपीईशिवाय मी शरीरावर कसा स्पर्श करु? ते म्हणाले की शरीर वजनदार आहे आणि मला मदत करावी लागेल. ती माझी स्वत: ची आई होती. मला माझी भीती सोडून पीपीईविना कोविड वॉर्डात जावे लागले. काही वेळाने त्याने मला बेडवरुन शरीर उचलण्यात मदत करण्यासाठी पुन्हा बोलावले आणि मला स्ट्रेचरवर ठेवण्यास सांगितले. '
पालिकेने दिले तपासाचे आदेश दिले
हा वाद समोर आल्यानंतर बीएमसीचे शताब्दी रूग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद नगरकर यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे सांगितले. सध्या या घटनेस जबाबदार असणाऱ्या दोन कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे.
वडिलांवरही सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
कुणाल हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असून सध्या तो बोरिवलीच्या गोखले महाविद्यालयात बीकॉम तृतीय वर्षाला आहे. त्याचे 55 वर्षांचे वडील पांडुरंग देखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांना बीएमसीच्या एका अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.