आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:साध्या पद्धतीने लग्न करुन उर्वरित पैशाने क्वारेंटाइन सेंटरला दान केले 50 बेड आणि ऑक्सीजन सिलेंडर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हनीमूनला जाण्याऐवजी कोव्हिड केअर सेंटरमध्ये सेवा करणार

मुंबईत कोरोना महामारीदरम्यान एका कपलने एक कौतुकास्पद उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. फक्त 22 पाहुण्यांच्या समक्ष जोडप्याने एकदम साध्या पद्धतीने लग्न केले आणि लग्नासाठी जमवलेल्या पैशातून 50 बेड एका क्वारेंटाइन सेंटरला दान केले. याशिवाय हनीमूनला जाण्याऐवजी दोघे कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करणार आहेत.

आधी लग्नात सामील होणार होते 2 हजार लोक

मुंबईतील वसईमध्ये राहणारा एरिक लोबो (28) आणि मर्लिन टस्कैनो (27) 7 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांचे याच महिन्यात जवळपास 2 हजार लोकांसमोर एकदम थाटामाटात लग्न होणार होते. यादरम्यान देशात कोरोना संक्रमण पसरले आणि लॉकडाउन घोषित झाला. यानंतर त्यांनी आपल्या लग्नात काही बदल करण्याचे ठरवले.

ऑक्सीजन सिलेंडर दान केले

दोघांनी शनिवारी वसईच्या सेंट गोनसालो चर्चमध्ये साध्या पद्धतीने फक्त 22 लोकांसमोर लग्न केले. संध्याकाळी कोणतेच रिसेप्शन ठेवले नाही. रिसेप्शनसाठी जे पैसे जमा केले होते, त्या पैशातून या दोघांनी सतपाला आयसोलेशन सेंटरला 50 बेड्स, गाद्या, उशा, चादरी आणि ऑक्सीजन सिलिंडरही दान केले.

पैसे वाचवण्यासाठी नवीन गाउनही घेतला नाही

मर्लिनने सांगितले की- 'या महामारीमध्ये रुग्णालयांना बेड्सची गरज आहे. आम्हाला खूप आनंद वाटत आहे की, या महामारीमध्ये आम्ही लोकांच्या कामी आलोत.' विशेष म्हणजे, हे दोघे एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवतात आणि हे लग्न कमीत कमी खर्चात करुन, त्यांनी आपले काम दाखवून दिले आहे. दोघांनी प्री-वेडिंग फंग्शनदेखील केले नाही. लग्नात आलेल्या पाहुण्यांकडून त्यांनी कोणतेच गिफ्ट घेतले नाही. इतकच नाही, तर मर्लिनने लग्नात घालण्यासाठी नवीन गाउनही घेतला नाही. तिने एका किरायाच्या गाउनमध्ये आपले लग्न केले.

प्रवासी मजुरांसाठी केले काम

मर्लिनने सांगितले की, प्रवासी मजुरांसाठी कम्युनिटी किचनसोबतच ट्रेनची व्यवस्थादेखील त्यांनी केली आहे. त्यांनी झेपल तेवढी मदत प्रवासी मजुरांना केली.  इतकच नाही, तर त्यांनी लग्नानंतर हनीमूनला जाण्याऐवजी कोव्हिड केअर सेंटरमध्ये रुग्णसेवा करण्याचे ठरवले आहे. या जोडप्याला आमदार क्षितिज ठाकुर यांचे प्रशंसा पत्रही दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...