आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मी शिवसेना बोलतेय':कल्याणमधील वादग्रस्त देखाव्याला कोर्टाची सशर्त परवानगी, मंडळाच्या लढ्याला गणपती पावला!

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कल्याणमधील विजय तरुण मित्र मंडळाने गणेशोत्सवानिमित्त साकारलेल्या 'मी शिवसेना बोलतेय' या देखाव्याला दोन दुरुस्त्यांसह मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.

देखाव्याला परवानगी मिळाल्याची माहिती शिवसेना नेते केदार दिघे यांनी ट्विट करून दिली. तसेच अंतिम विजय हा सत्याचाच होतो, असेही त्यांनी म्हटले.

न्यायालयाने दोन दुरुस्त्यांसह या देखाव्याला पुन्हा परवानगी दिली आहे. या दुरुस्तीमध्ये exhibit C मधल्या पान. क्र 42/43 (ट्रान्सस्क्रिप्ट) मधल्या ॲाडिओमध्ये काही बदल करायचे आहेत.

विजय तरुण मंडळाने यंदा निष्ठेवर आधारित ‘मी शिवसेना बोलतेय’ हा चलचित्र देखावा तयार केला होता. गेल्या महिनाभरापासून समाज माध्यमावर या देखाव्याची जोरदार चर्चा सुरू होती. मी शिवसेना बोलतेय इथून या चलचित्र देखाव्याची सुरूवात करण्यात आली होती. या देखाव्यात शिवसेनेला मोठा वृक्ष दाखवण्यात आला आहे. या वृक्षाला फळे लागल्यानंतर ती इतर पक्ष खातात अशा आशयाचा हा देखावा होता.

पोलिसांची कारवाई

31 ऑगस्टच्या मध्यरात्री विजय तरुण मित्र मंडळाच्या या देखाव्यावर आक्षेप घेत कल्याण पोलिसांनी कारवाई केली होती. तसेच पोलिसांनी देखाव्याचे सगळे साहित्यही जप्त केले होते. त्यानंतर विजय तरुण मित्र मंडळाने या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पोलिसांच्या या कारवाई निषेधार्थ कल्याणमधील हिंदुत्ववादी कार्यकर्ते, गणेशभक्त आणि शिवसैनिक एकवटले. सरकारच्या निषेधार्थ महाआरती करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...