आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोर्टाचा अनोखा निर्णय:अल्पवयीन पीडितेसोबत लग्न करण्यास तयार झाला बलात्काराचा आरोपी, कोर्टाने दिला जामीन; पहिलेच विवाहित आहे आरोपी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीडित मुलीच्या आईने आरोपीला सोडण्याची विनंती केली

अल्पवयीन मुलीला गर्भवती केल्याच्या प्रकरणात कोर्टाने 25 वर्षांच्या आरोपीला गुरुवारी जामीन दिला. त्याला प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेंस (POCSO) प्रकरणात अटक करण्यात आली होती. आरोपीने POCSO कोर्टासमोर इच्छा व्यक्त केली होती की, तो अल्पवयीन मुलीसोबत लग्न करण्यासाठी तयार आहे. खरेतर आरोपी हा पहिलेच विवाहित आहे. तरीही कोर्टाने मान्य केले की, दोघांनी परस्पर सहमतीने संबंध ठेवले होते.

पीडित मुलीच्या आईने आरोपीला सोडण्याची विनंती केली
पीडित मुलीच्या आईनेही कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करत तरुणाला जामीन देण्याची मागणी केली होती. आरोपीने आपल्या मुलीशी लग्न करावे अशी त्यांची इच्छा असल्याचे आईने कोर्टाला सांगितले. अल्पवयीन मुलीने आरोपीच्या बाळाला जन्म दिला आहे. खास गोष्ट म्हणजे आईने सुरुवातीला आरोपीविरूद्ध FIR दाखल केला होता. आईने पहिले सांगितले होते की, या तरुणाने अल्पवयीन मुलीला धमकी दिली होती की, तिने बाळाचा पिता म्हणून त्याची ओळख करुन देऊ नये.

मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर लग्नासाठी तयार झाला तरुण
या तरुणामध्ये आणि 16 वर्षाच्या मुलीमध्ये सहमतीने संबंध असल्याचे कोर्टाला आढळले. तसेच 2 वर्षांनी मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तरूण मुलीशी लग्न करण्यासही तयार आहे. त्या आधारे आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. आरोपी हा मुलीच्या वडिलांचा परिचित आहे. मुलीने गर्भवती असल्याची बाब लपवून ठेवली होती.