आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चरस तस्करी:मुंबई क्राईम ब्रॅंचची मोठी कारवाई, तब्बल 1 कोटी 18 लाखांचा चरस जप्त

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईच्या क्राईम ब्रॅंचने आज एक मोठी कारवाई करत मुंबईच्या वांद्रे परिसरातून तब्बल 1 कोटी 18 लाखांचा चरस जप्त केला आहे. वांद्रेच्या चिचंवाडी वॅाटर फिल्टर रोड, चायना गेट हाँटेलजवळ हा चरसचा साठा लपवून ठेवला असल्याची माहिती गुन्हे शाखा 7 च्या पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलीसांनी छापा टाकत मोठ्या प्रमाणात चरस जप्त केला आहे...

पोलिसांनी या कारवाई दरम्यान तब्बल 3, 960 ग्रँम चरस हस्तगत केले असून हे चरस दोन महिला तस्कर विकत असल्याचे देखील समोर आले आहे किशोरी गवळी (57), जोहराबी शेख, अकबरअली शेख (75) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीसांनी यांना ताब्यात घेतले असून त्यांची अधिक चौकळी केली जात आहे.

मुंबईच्या विविध भागातून चरस तस्करीसाठी या दोन महिलांकडे येत असल्याचे देखील या तपासात समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...