आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिरियल मॉलेस्टरला अटक:50 महिलांचा विनयभंग करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, याआधी 12 वेळा तुरुंगात पाठवण्यात आले होते

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपीवर 40 हून अधिक गुन्हे दाखल, आरोपीपर्यंत शाप्रकारे पोहोचले पोलिस

मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या 9 वर्षांपासून मुलींचा विनयभंग करणाऱ्या सिरियल मॉलेस्टरला अटक केली आहे. या 30 वर्षीय आरोपीवर 50 पेक्षा अधिक महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. महिलांचा विनयभंग केल्यानंतर तो आपले घर बदलत होता असे तपासात समोर आले आहे.

या आरोपीला 2011 मध्ये एका महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी पहिल्यांदा अटक झाली होती. तथापि जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने किमान 50 महिलांसोबत तसेच अश्लील कृत्य केल्याचेही तपासात समोर आले आहे.

आरोपीवर 40 हून अधिक गुन्हे दाखल आहेत

मुंबईतील दिंडोशी पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या व्यक्तीचे नाव कल्पेश देवधर असे आहे. व्यवसायाने चालक असलेला कल्पेश महिलांची छेडछाड करण्यासाठी स्पोर्ट्स बाइक वापरत असे. तो एकट्या जाणाऱ्या महिला, मुलींसमोर आपली दुचाकी उभी करून आधी बोलायचा त्यानंतर त्यांच्याशी अश्लील कृत्य करून फरार व्हायचा. बर्‍याच वेळा तो मुलींचा पाठलाग करत त्यांच्या घरापर्यंत जायचा आणि अश्‍लील हावभाव करत असे. पोलिसांना काही सीसीटीव्ही फुटेजही मिळाले असून त्या आधारे त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरोधात मुंबईतील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात 40 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

अशाप्रकारे आरोपीपर्यंत पोहोचले पोलिस

12 डिसेंबर रोजी दिंडोशी पोलिस ठाण्यांतर्गत 24 वर्षीय महिलेचा विनयभंग झाला होता. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पोलिसांच्या हाती लागलेल्या एका व्हिडिओत आरोपी महिलेबरोबर अश्लील कृत्य करताना दिसत आहे. या व्हिडिओवरून पोलिसांना आरोपीचा दुचाकी क्रमांक सापडला आणि आरोपीची ओळख पटली. परंतु, वारंवार घर बदलल्यामुळे पोलिस त्याच्यापर्यंत सहज पोहोचू शकले नाहीत, परंतु इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलान्सच्या मदतीने मंगळवारी त्याला IPC च्या 354 (महिलेचा विनयभंग) आणि धमकी देण्याच्या (506) आरोपाखाली अटक करण्यात आली.

आरोपीला 12 पेक्षा जास्त वेळा अटक करण्यात आली आहे

आरोपींच्या अटकेनंतर पवई परिसरातील एका महिलेचा शोध लागला. 2017 मध्ये कल्पेशने तिचा विनयभंग केला होता. पोलिस उपनिरीक्षक गणेश फड म्हणाले, 'आरोपी कल्पेश देवधर हा सध्या व्यवसायाने ड्रायव्हर असून तो मुंबईच्या चारकोप भागात राहतो, परंतु गुन्हा केल्यावर त्याने अनेकदा घर बदलले. कल्पेशविरोधात मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात छेडछाडीची अनेक डझनभर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, तर यापूर्वी 12 हून अधिक घटनांमध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. तो नुकताच डीएन नगर पोलिस ठाण्यात विनयभंगाच्या प्रकरणात जामिनावर बाहेर आले.

आरोपीच्या वागण्याने त्रस्त होऊन आईने घराबाहेर काढले होते

पोलिसांनुसार, देवधर काही वर्षांपूर्वीपर्यंत आपली आई आणि 3 भावांबरोबर मलाड वेस्टमध्ये राहत होता. पण त्याच्या या वागण्यामुळे कुटुंबीयांनी त्याला घराबाहेर काढले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser