आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
व्हॅलेंटाइन वीकच्या पार्श्वभूमीवर मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी एका प्रेमभंग झालेल्या युवकाने आपल्या माजी प्रेयसीला पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण, यात त्याचाच मृत्यू झाला. आरोपी प्रियकराने आपल्या प्रेयसीला जिवंत जाळण्यासाठी आग लावली. यात तिने पेट घेताच आरोपी प्रियकराला मिठी मारली.
आगीत होरपळत असताना तिने आरोपी प्रियकराला घट्ट पकडले आणि सोडलेच नाही. यात त्या तरुणीसह आरोपी सुद्धा गंभीररित्या होरपळला. संबंधित तरुणी 80 टक्के भाजली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
वाईट सवईमुळे तरुणीने लग्नास नकार दिला होता
विजय कांबळे असे मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो आपल्या वहिनीच्या बहिणीवर मागील अडीच वर्षांपासून प्रेम करयचा आणि लग्नासाठी दबाव टाकत होता. आरोपीला कांबळे कोणतेच काम करत नव्हता आणि त्याला दारुचे व्यसनही होते. यामुळेच तरुणीने आणि तिच्या घरच्यांनी लग्नास नकार दिला होता.
तरुणीने मागच्या आठवड्यात आत्महत्येचा प्रयत्न केला होता
लग्नास नकार दिल्यामुळे आरोपी तरुणीला त्रास देत होता. त्याच्या त्रासामुळे त्रस्त होऊन तरुणीने मागच्याच आठवड्यात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ती एका आठवड्यापूर्वीच घरी परतली होती. शुक्रवारी घरी कुणी नसताना आरोपी तिच्या घरी गेला आणि तरुणीवर पेट्रोल टाकून आग लावली. यानंतर तरुणीने आरोपीला घट्ट पकडले आणि दोघांच्या शरीराला आग लागली.
दोघांना जळताना पाहून शेजाऱ्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर त्यांना जेजे रुग्णालयात रेफर करण्यात आले. तिथे 90 टक्के भाजलेल्या विजयचा मृत्यू झाला. सध्या तरुणीवर उपचार सुरू आहेत. सध्या पोलिस तपास करत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.