आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलिकांचा नवा खुलासा:एनसीबी अधिकारी आणि सॅम डिसूझाची ऑडिओ क्लिप व्हायरल, नवाब मलिकांनी केले ट्विट

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक नवाब मलिक यांच्यातील यांच्यातील आरोप प्रत्यारोपांची मालिका अजुनही सुरूच आहेत. नवाब मलिक हे समीर वानखेडेंविषयी आणि क्रूझ ड्रग्स प्रकरणाविषयी दररोज नवनवीन खुलासे करत आहेत. आजही त्यांनी एक ट्विटरवर एक ऑडिओ क्लिप शेअर करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नवाब मलिकांनी आजही पत्रकार परिषद घेतली. यापूर्वी त्यांनी ट्विटरवर एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. या क्लिपमध्ये सॅम डिसूझा आणि एनसीबीचे अधिकारी व्ही.व्ही. सिंह यांच्यातील संवाद असल्याचा दावा नवाब मलिकांकडून करण्यात आला आहे. यामध्ये सॅनविल हा एनसीबी अधिकारी सिंह यांना नोटिशीविषयी विचारणा करत असल्याचे दिसत आहेत. तसेच यामध्ये सॅनविलने व्ही व्ही सिंह यांच्याकडे घरी नोटीस पाठवण्याविषयी विचारणा केली आहे. यावेळी सॅनविलने तब्येत बरी नाही यामुळे मी सोमवारी एनसीबी कार्यालयात येऊ का? असे विचारले. त्यावर सिंह यांनी सोमवारी नको मग तू बुधवारी ये असे म्हटले आहे. तसेच, तुझा मोबाईल घेऊन ये. माझ्याकडे तुझा आयएमआय नंबर आहे. मी तुला आधीच वॉर्निंग देतोय, असे ऑडियो क्लिपमध्ये म्हटले आहे.

या ट्विटमध्ये नवाब मलिक यांनी ट्विटरवर सॅम डिसूझाचा फोटो शेअर केला आहे. ते म्हणाले की, ही व्यक्ती सॅम डिसूझा नाही. त्याचे खरे नाव हे सॅनविले स्टेनली डिसूझा आहे. त्याच्या खऱ्या नावाने एनसीबीने ड्रग्ज केस प्रकरणी नोटीस पाठवली आहे.

बातम्या आणखी आहेत...