आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:लोकल सुरु करा अन्यथा महिन्याला 3 हजार रुपये अनुदान द्या, मुंबईतील डबेवाल्यांची सरकारकडे मागणी

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊन झाल्याने जवळपास साडेपाच महिन्यांपासून डबेवाल्यांना रोजगार मिळालेला नाही

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. अनेक व्यापारी, सर्वसामान्यांसह मुंबईतील डबेवाल्यांनाही लॉकडाऊनचा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे डबेवाल्यांची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे. यामुळे मुंबईतील लोकसेवा लवकर सुरू करा, अन्यथा डबेवाल्यांना दर महिना किमान 3 हजार रुपये अनुदान द्या अशी मागणी डबेवाल असोशिएशनतर्फे करण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता डबेवाल्यांनी 19 मार्चपासून डबे पोहचवणे बंद केले होते. त्यानंतर राज्यभरात लॉकडाऊन लावण्यात आले. यामुळे जवळपास साडेपाच महिन्यांपासून डबेवाल्यांकडे रोजगार मिळाला नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे.

मुंबई थोडी-थोडी पूर्व पदावर येऊ पाहाते आहे. काही शासकीय, निमशासकीय, तसेच कार्पोरेट कार्यालये चालू होत आहेत. या कार्यालयात चाकरमानी अंशत: का होईना रूजू होऊ लागला आहे. हे चाकरमानी आपल्या डबेवाल्याला फोन करून डबे पोहचवायला सांगत आहे. पण लोकलसेवा जोपर्यंत पुर्णपणे सुरू होत नाही तोपर्यंत डबेवाला कामावर रूजू होऊ शकत नाही. त्यामुळे मुंबईची लोकलसेवा सुरू करा अथवा डबेवाल्यांना महिना किमान 3 हजार रूपये अनुदान द्या अशी मागणी मुंबईच्या डबेवाल्यांनी केली आहे.

लोकल रेल्वे मुंबईची लाईफलाईन आहे, तशीच डबेवाल्यांची लाईफलाईन लोकलच आहे. त्यामुळे जो पर्यंत लोकल सेवा सुरु होत नाही, तोपर्यंत तरी डबेवाल्यांना आपली सेवा देणे शक्य नाही, असे मत सुभाष तळेकर यांनी व्यक्त केले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser