आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादर रेल्वे स्थानक:गंभीर गुन्ह्यातील आरोपी महिलेचा पळून जाण्याचा प्रयत्न सीसीटीव्हीमध्ये कैद, पोलिसांनी सतर्कता दाखवत महिलेला घेतले ताब्यात

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वेळीच लोकल चालकांनी ब्रेक दाबल्यामुळे दोघांचेही प्राण वाचले आहेत

मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकात पोलिसांनी एका महिलेचा जीव वाचवल्याची घटना समोर येत आहे. ही महिला एक आरोपी असल्याची माहिती देखील समोर आली आहे. काही गंभीर गुन्ह्याची नोंद तिचावर असल्याची माहिती सुद्धा पोलिसांनी दिली आहे. या घटनेचे आता सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत.

दादर रेल्वे स्थानकात पोलिस या महिलेला घेऊन जात असताना समोरून रेल्वे येतानाचे पाहताच तिने पोलिस अधिकाऱ्यांचा हात झटकत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तिने थेट रेल्वे रूळावरच उडी घेतली मात्र सोबत असलेल्या पोलिसांनी सतर्कता दाखवली आणि या महिलेला पुन्हा ताब्यात घेतले. महत्वाचे म्हणजे वेळीच लोकल चालकांनी ब्रेक दाबल्यामुळे दोघांचेही प्राण वाचले आहेत. या महिलेवर खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यांची देखील नोंद असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...