आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमानवीय:पुण्यातील घटनेची मुंबईतही पुनरावृत्ती; लॉकडाऊनमध्ये 5 तास रस्त्यावर तडफडून झाला मृत्यू

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • घटनेचा व्हिडिओ भाजप नेते किरीट सोमैया यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे

पुण्यानंतर मुंबईतही एका वृद्धाला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटना शुक्रवारी दहिसर परिसरात झाली. भाजपे नेते किरीट सोमैया यांनी ट्विटरवर घटनेचा व्हिडिओ शेअर केला. काही दिवसांपूर्वी पुण्यातही अशीच घटना घडली होती. वेळेवर अँब्यूलन्स न मिळाल्यामुळे एका वृद्धाचा रस्त्यावर मृत्यू झाला होता.

चार तास, मदत मिळाली नाही

भाजप नेते किरीट सोमैया यांनी ट्विटरवर लिहीले, “दहिसरच्या शांती नगरमध्ये आणखी आणखी एकाचा रस्त्यावर मृत्यू झाला. त्यांना वेळेवर अँब्यूलंस आणि उपचार मिळाला नाही. एका चौकीदाराला श्वास घेण्यास त्रास होता. सकाळी 11.30 पोलिस आणि बीएमसीला माहिती देऊन मदत मागण्यात आली. दुपारी 3.30 वाजता या व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिस आणि बीएमसीने या घटनेची पुष्टी केली.”

पुण्यात रस्त्यावर एकाचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी पुण्यातील नानापेठ परिसरात एका वृद्धाचा अशा परिस्थितीत मृत्यू झाला. त्यांनाही वेळेवर उपचार मिळाला नाही. तो वृद्ध ज्या परिसरा राहत होता, तो परिसर हॉटस्पॉट होता. या परिसरा जागोजागी बॅरीकेड लावलेले असल्याने त्या व्यक्तीला वेळेवर उपचार देण्यासाठी अँब्यूलन्सला येता आले नाही. 

बातम्या आणखी आहेत...