आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई-दिल्ली विमानसेवा बंद?:कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे दिल्ली ते मुंबई विमान आणि रेल्वे सेवा बंद करू शकते महाराष्ट्र सरकार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार मुंबईतील शाळा, महापालिकेचा निर्णय
  • उर्दू शाळा संघटना म्हणतात- लस आल्याशिवाय शाळा सुरू करणार नाही

देशात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली ते मुंबई आणि मुंबई ते दिल्ली विमान सेवा बंद केले जाऊ शकते. केवळ विमानसेवाच नव्हे तर रेल्वे सुद्धा बंद होणार असल्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून कोरोनावर महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. याच बैठकीत विमान आणि रेल्वे सेवा थांबवण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री लवकरच कॅबिनेटची बैठक घेणार असल्याची शक्यता आहे.

मुंबई दिल्ली प्रवासासाठी सध्या 6 रेल्वे
सध्या मुंबई आणि दिल्ली प्रवासाकरिता मध्य रेल्वेकडून एक आणि पश्चिम रेल्वेकडून गाड्या चालवल्या जातात. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी एसके जैन यांनी सांगिते की त्यांच्याकडे अद्याप यासंदर्भात कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही.

कोरोनाचा धोका पाहता निर्णय:आता मुंबईतील शाळा थेट पुढच्या वर्षीच उघडणार, आयुक्त इक्बाल चहल यांचा निर्णय

उर्दू शाळा संघटना म्हणतात लस आल्याशिवाय शाळा सुरू करणार नाही

उल्लेखनीय बाब म्हणजे, महाराष्ट्र सरकारने सोमवारपासून 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे मुंबई महापालिकेने जानेवारीपर्यंत शाळा उघडणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर अखिल भारतीय उर्दू शाळांच्या संघटनेने सुद्धा लस आल्याशिवाय शाळा सुरू करणार नाही असे जाहीर केले. हेच धोरण राज्यभर राबवले जाणार अशी सुद्धा चर्चा रंगली आहे.

बातम्या आणखी आहेत...