आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जनहित याचिका:भीक मागणार्‍या मुलांसाठी शहरांत घरे बांधण्याची मागणी, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोर्टाने ही याचिका सुनावणीसाठी स्वीकारली आहे - फाइट फोटो
  • सरकारला महाराष्ट्र भीक प्रतिबंधक अधिनियम 1959 मधील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सरकारला देण्यात यावी अशी याचिकेत मागणी

रस्त्यांवर भीक मागणाऱ्या मुलांना राहण्यासाठी घर मिळावे या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यभर 'बेगर्स होम' बांधण्याची मागणीही याचिकाकर्त्याने केली आहे. पुण्यातील व्यावसायिक ज्ञानेश्वर दरवाटकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने याचिका सुनावणीसाठी स्वीकारली असून यावर 24 जुलै रोजी सुनावणी होऊ शकते.

कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी

राज्य सरकारला केंद्र सरकारचे कौशल्य विकास धोरण प्रभावीपणे राबविण्यास सांगितले पाहिजे असे या याचिकेत म्हटले आहे. याचिकेनुसार 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुले आणि महिला अनेकदा रहदारी सिग्नल व इतर ठिकाणी भीक मागताना दिसतात. त्यामुळे सरकारला महाराष्ट्र भीक प्रतिबंधक अधिनियम 1959 मधील तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात यावे. कारण या कायद्यात भिकाऱ्यांसाठी घरे आणि संस्था बनविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

मुलांच्या तस्करीवर बंदी घालण्याची मागणी

या याचिकेत भीक मागण्यासाठी होणाऱ्या मुलांच्या तस्करीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी ठोस पावले उचलणे अपेक्षित असल्याचे याचिकेत म्हटले आहे. जेणेकरुन मुलांचे शोषण रोखता येईल.

याचिकाकर्त्याचा सरकारवर आरोप 

पुण्यातील व्यावसायिक ज्ञानेश्वर दरवाटकर यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा दावा केला भीक मागण्यावर नियंत्रण ठेवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. भीक मागणारी मुले व महिलांच्या पुनर्वसन व संवर्धनासाठी योग्य ती पावले उचलण्यासाठी सरकारला विशेष निर्देश दिले पाहिजेत.  महिला व बालविकास विभागाच्या धोरणांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकेत केली आहे.