आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीतून रिपोर्ट:'धारावी मॉडल'ची जगभरात स्तुती होत होती, मग अचानक काय झाले की, येथे पुन्हा कोरोना ब्लास्ट झाला?

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धारावीमध्ये 3 हजारांपेक्षा जास्त कोरोना प्रकरणं झाले आहेत, दहा दिवसांपासून पुन्हा झपाट्याने वाढत आहेत रुग्ण, 180 पेक्षा जास्त अॅक्टिव्ह केस, जूनमध्ये येथे कोरोनावर मिळवले होते नियंत्रण
  • धारावी येथे दहा लाखांहून अधिक लोक राहतात, धारावीला एशियाची सर्वात मोठी झोपडपट्टी म्हटले जाते, बहुतेक घरात एकाच खोली आहे
  • येथील लोकांजवळ वर्क फॉम होमसारखा कोणताही ऑप्शन नाही, लोक म्हणतात - कोरोनापासून वाचलो तर भूकेने जीव जाईल, यामुळे घराबाहेर पडणे आवश्यक

धारावी… हे नाव ऐकताच मनात झोपडपट्ट्यांचे चित्र तयार होऊ लागते. 2.5 स्क्वेयर किलोमीटरवर पसरलेल्या आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीमध्ये दहा लाखांपेक्षा अधिक लोक राहतात. एप्रिलमध्ये येथे कोरोनाचा स्फोट झाला. परंतु जूनपर्यंत हा विषाणू पूर्णपणे नियंत्रित झाला होता. त्यामुळे 'धारावी मॉडेल' ची बरीच चर्चा झाली. आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येत असल्याचे दिसत आहे. धारावीतील कोरोना प्रकरणे 3 हजारांच्या पुढे गेली आहेत. गेल्या दहा दिवसांपासून दररोज प्रकरणांची संख्या दुप्पट वाढत आहे. सध्या 180 हून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत. अशा परिस्थितीत आम्ही धारावीला पोहोचलो आणि कोरोनाला रोखण्यासाठी 'धारावी मॉडेल' काय होते, सध्या काय परिस्थिती आहे आणि लोक आपले जीवन कसे जगतात याची माहिती घेतली.

धारावीत पक्क्या झोपड्या आहेत ज्या वरुन अशा दिसतात.
धारावीत पक्क्या झोपड्या आहेत ज्या वरुन अशा दिसतात.

अरुंद गल्ल्या, लहान-लहान खोल्या. खोलीत स्वयंपाकघर आणि तेथेच भांडी धुण्याची एक जागा. घरात राहणारे सरासरी पाच ते सात लोक. काही घरांमध्ये बारा ते पंधरा लोक. येथे सोशल डिस्टंसिंगविषयी बोलणे निरर्थक आहे, कारण जागा इतकी कमी आहे की एकमेकांपासून अंतर ठेवणे शक्य नाही. बर्‍याच घरांमध्ये प्रत्येकी एकच खोली असते. आकार 10 बाय 10 फूट असेल. येथील झोपड्या कच्च्या नसुन पक्क्या आहेत. गुरुवारी सकाळी दहा वाजता आम्ही इथे पोहोचलो तेव्हा धारावी पूर्वीसारखी दिसत होती. बाजारपेठा खुल्या होत्या. लोक व्यवसायावर बाहेर जात होते. मास्क मोजक्याच लोकांच्या चेहऱ्यावर दिसत होते. हँड सॅनिटायझर यासारख्या वस्तूचा वापर इथे जास्त केलाच जात नसेल. होय, पण धारावीचे रस्ते स्वच्छ दिसत होते. इथल्या लोकांना आता कोरोनाची भीती वाटत नाही, कारण आता मुद्दा पोटाचा आहे. ते म्हणतात की आम्ही कोरोनामुळे मेलो नाही तर उपासमारीने मरु यामुळे आम्हाला कामावर जावे लागेल. गेल्या आठवड्यापासून येथे दररोज कोरोना रुग्ण आढळत आहेत.

कुणी भाडे भरु शकत नाहीये तर कुणावर हजारो रुपये कर्ज झाले
आम्ही धारावीचे वास्तव जाणून घेण्यासाठी आतल्या गल्ल्यांमध्ये गेलो. पहिल्या गल्लीत शिरताच सारोदेवी दिसल्या. एका छोट्या खोलीत त्या भजे तळत होत्या. तुम्ही कोणासाठी एवढे समोसे, वडे, भजी कुणासाठी बनवत आहात? असे विचारल्यावर म्हणाल्या माझा मुलगा सायन रुग्णालयाबाहेर विकतो. पाच-सहा महिने काम बंद होते. पंधरा दिवसांपूर्वीच सुरू झाले आहे. लॉकडाउनमध्ये कसे भागले? यावर म्हणाल्या की, फ्रीमध्ये राशन वाटले जात होते, तेच घेतले. सरकारकडून काही रेशनही मिळाले. आमच्याकडे काही सामान होते. असं करुन कसे तरी दिवस काढले. व्यवसाय बंद होता, म्हणून ना भाडे भरता आले ना वीज देता आले. 25 हजार रुपयांचे कर्जही झाले. आता काम सुरू झाले आहे तर थोडे-थोडे करुन कर्ज फेडू. सारोदेवीच्या घराच्या पुढच्या गल्लीत अनीता भेटल्या. त्यांचा एक पाय काम करत नाही. पती देखील दिव्यांग आहे. दोन मुलं आहेत, ज्यामधील एकाला आई-वडिलांची दिव्यांगता आली. दुसरा मुलगा चांगला आहे. दहा बाय दहाच्या खोलीत अनिता यांचे संपूर्ण कुटुंब राहते. पती मातीचे भांडे बनवतात. त्यांचा मुलगा चिराग म्हणतो - वडिलांचा माल विकतो तेव्हाच घरात पैसे येतात. खोलीचे भाडे तीन हजार रुपये महिना आहे. मात्र चार-पाच महिन्यांपासून भरले नाही. घरमालत म्हणाला लवकर भाडे भरले नाही तर खोली खाली करावी लागेल.

या सारो देवी आहेत त्या म्हणाल्या की, लॉकडाउनमध्ये खाण्या-पिण्याचे हाल झाले होते. आता भजी, समोसा विकून कुटुंब चालवत आहे.
या सारो देवी आहेत त्या म्हणाल्या की, लॉकडाउनमध्ये खाण्या-पिण्याचे हाल झाले होते. आता भजी, समोसा विकून कुटुंब चालवत आहे.

धारावीच्या जास्तीत जास्त घरात महिला खाण्यापिण्याच्या वस्तू तयार करतात आणि त्यांचे मुलं किंवा पती हे साहित्य बाहेर विकतात. किंमत खूप कमी असते यामुळे माल विकला जातो. 10 रुपयात पाच इडली विकणाऱ्या मारिया डोक्यावर मोठे टोपले घेऊन जाताना दिसल्या. हातात एक थैला होता. ज्यामध्ये तीन डब्बे ठेवलेले होते. त्या इडली आणि वडासांभर विकण्यासाठी निघाल्या होत्या. आम्ही थांबवले तर हसत म्हणाल्या की, मी लॉकडाउनमध्येही लपुन-छपून इडली-वडा विकला कारण घरात काही खाण्यासाठीच नव्हते. पैशांची खूप गरज होती म्हणून मी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये इडली-वडा भरुन नेत होते आणि धारावीच्या गल्ल्यांमध्ये विकून येत होते.

मारिया महिन्यांत 25-30 हजार कमवते. या पैशांमधून त्यांना फक्त घर चालवायचे नाही तर मुलांचे शिक्षणही करायचे आहे. धारावीमध्ये मोठ्या प्रमाणात दक्षिण भारतीय राहतात जे इडली-सांभर घरी तयार करुन बाहेर विकतात. या अरुंद गल्ल्यांमध्ये अनेक स्मॉल स्केल बिझनेस चालतात. कुणी मातीचे भांडे बनवते, तर कुणी चप्पल शिवते. कपड्यांच्या लहान-लहान फॅक्ट्र्या देखील आहेत. हे पूर्णपणे मार्केट उघडण्यावर उवलंबून आहे. वर्क फ्रॉम होमचे कोणतेही ऑप्शन यांच्याकडे नाही. रोजीरोटीसाठी यांना ग्राहकांपर्यंत पोहोचावेच लागते. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून सर्वांनीच आपले व्यवसाय सुरू केले आहे मात्र पहिल्यासारखे ग्राहक आलेले नाहीत.

मारिया केरळच्या राहणाऱ्या आहेत. सकाळी 10 वाजता घराबाहेर पडते संध्याकाळी उशीरा घरी येते.
मारिया केरळच्या राहणाऱ्या आहेत. सकाळी 10 वाजता घराबाहेर पडते संध्याकाळी उशीरा घरी येते.

परप्रांतिय परतत आहेत यामुळे कोरोना रुग्णांमध्ये होतेय वाढ
अखेर धारावी मॉडेल काय होते? ज्यामुळे कोरोना कंट्रोल झाला होता? हा प्रश्न आम्ही धारावीमध्ये 26 वर्षांपासून क्लीनिक चालवणाऱ्या आणि कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉ. मनोज जैन यांना विचारला. ते म्हणाले, धारावीमध्ये 1 एप्रिलला पहिला रुग्ण आढळला होता. यानंतर येथेल लोक कोरोनाने कमी आणि हार्ट अटॅकने जास्त मरत आहेत. कारण ते खूप घाबरले होते. 7 एप्रिलपासून आमच्या दहा डॉक्टर्सच्या टीमने काम सुरु केले. आम्ही घरोघरी जाऊन स्क्रीनिंग सुरू केली. ज्यांना ताप आला त्यांना बीएमसीच्या हवाले करण्यात आले. यानंतर डॉक्टर्सची संख्या वाढवून 25 झाली. फीव्हर क्लीनिक सुरू करण्यात आले. रोज हजारो लोकांची स्क्रीनिंग करत होते. ज्या लोकांना लक्षण होते त्यांच्यावर वेगळे करुन उपचारांसाठी पाठवणे सुरू केले. यासोबतच मास्क, हँड सॅनिटायझर, स्वच्छता आणि सोशल डिस्टेंसिंगसाठी लोकांना जागृक केले. याचा फायदा असा झाला की, कोरोना नियंत्रणात आला होता. याचे एक मोठे कारण म्हणजे मोठ्या संख्येत लोकांनी पलायन केले होते. यूपी, बिहार, केरळ, मप्रचे लोक येथून आपल्या घरी गेले होते. यामुळे गर्दी कमी झाली होती.

नजमुन्नीसा धारावीत राहतात. त्या म्हणतात की, पहिले मुलं एक-एक बिस्किटचा पुडा खायचे. आता एका पॉकेटमध्ये तीन जणं खातात. लॉकडाउनच्यापूर्वी काम मिळत होते. आता ते देखील मिळत नाही.
नजमुन्नीसा धारावीत राहतात. त्या म्हणतात की, पहिले मुलं एक-एक बिस्किटचा पुडा खायचे. आता एका पॉकेटमध्ये तीन जणं खातात. लॉकडाउनच्यापूर्वी काम मिळत होते. आता ते देखील मिळत नाही.

आता अचानक का वाढत आहेत केस? यावर डॉक्टर म्हणाले की, ज्या लोकांनी पलायन केले होते, ते आता परतत आहेत. लोकांमध्ये कोरोनाची भीती कमी झालली आहे. यामुळे कुणीच नियमांचे पालन करत नाही. स्क्रीनिंगही सध्या बद आहे. धारावीमध्ये प्रत्येक घरात वॉशरुम नाही. लोक सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. हे देखील कोरोना पसरण्याचे मोठे कारण आहे. कमी जागेत जास्त लोक राहत असल्याने येथील लोकांमध्ये स्कीन डिजीज कॉमन आहे. ते स्वच्छता ठेवत नाही. जर कोरोना रोखण्यासाठी येथे योग्य वेळी पाऊल उचलले नाही तर परिल्यासारखी परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. धारावी वॉर्ड 188 चे वार्ड अध्यक्ष विल्सन नंदेपाल म्हणतात, येथील अनेक लोक दुसऱ्या क्षेत्रांमध्ये मजुरी करण्यासाठी जातात. मात्र लोकल बंद असल्यामुळे ते जाऊ शकत नाही. प्रवास पूर्णपणे बंद आहे. जर सरकारने लवकर मदत केली नाही तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल.

बातम्या आणखी आहेत...