आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईची घटना:महिलेवर तीन तरुणांनी 2 वर्षे केला बलात्कार, व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले; अॅसिड टाकण्याची धमकीही दिली

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी या प्रकरणात 2 मुख्य आरोपींना अटक केली आहे
  • आरोपींपासून बचाव करण्यासाठी महिला मुंबई सोडून गावात निघून गेली

मुंबईच्या दिंडोशी येथे दोन वर्षांपासून एका 22 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी पहाटेपर्यंत यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तिसर्‍याचा शोध घेण्यात येत आहे. या महिलेने पोलिसांना सांगितले आहे की आरोपीने तिला बलात्काराचा व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केले आणि याबद्दल कुणाला माहिती दिल्यावर अॅसिड टाकण्याची धमकी दिली. या कारणास्तव, ती इतके दिवस शांत राहिली. या प्रकरणात पोलिसांनी 31 वर्षीय फय्याज शेख आणि 27 वर्षीय साजिद पटेल याला अटक केली असून तिसरा आरोपी नदीम फरार आहे.

आरोपी फय्याजशेख आणि साजिद पटेल
आरोपी फय्याजशेख आणि साजिद पटेल

एका आरोपीचे महिलेच्या घरी होते येणे-जाणे
पीडिता आपला पती आणि अडीच वर्षाच्या मुलासोबत मलाड ईस्ट परिसरात राहत होती. आरोपींमधून एक फैयाज शेखही महिलेच्या शेजारी राहायचा आणि त्याचे पीडितेच्या घरी येणे जाणे होते. दोन वर्षांपूर्वी त्याने महिलेला आपल्या घरी बोलावले आणि तिच्यावर कथित रुपात बलात्कार केला. छुप्या कॅमेऱ्याने तिचा व्हिडिओ तयार करुन तो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला.

बलात्कारापासून बचाव करण्यासाठी महिलेने मुंबई सोडली
वरीष्ठ पोलिस निरीक्षक डीएस कांबळे यांनी सांगितले की, या घटनेच्या एका वर्षानंतर फैयाज शेखने व्हिडिओ आपला मित्र सादिक पटेल आणि नादिमला शेअर केला. दोघांनी इंटरनेटवर व्हिडिओ अपलोड करणे आणि तिच्या पतीला याची माहिती देण्याची धमकी देत महिलेवर अनेकवेळा बलात्कार केला. महिलेने या ब्लॅकमेलिंगपासून बचाव करण्यासाठी मुंबई सोडली. मात्र आरोपींनी तिला शोधत गावही गाठले. यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला आणि महिलेने आपल्यासोबत दोन वर्षांपासून होत असलेल्या अत्याचारांची माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...