आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्याचा डिलिव्हरी बॉयच्या प्रायव्हेट पार्टला चावा:लिफ्टमधून बाहेर निघताच जर्मन शेफर्डचा Zomato बॉयवर हल्ला, VIDEO व्हायरल

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाझियाबादनंतर आता मुंबईत लिफ्टमध्ये पाळीव कुत्रा चावल्याची घटना समोर आली आहे. एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर कुत्र्याने हल्ला केला. हा डिलिव्हरी बॉय लिफ्टमधून बाहेर येत होता. तेवढ्यात कुत्र्यानं त्याचं गुप्तांगावर हल्ला केला. नवी मुंबईजवळील पनवेल येथील इंडियाबुल्स ग्रीन्स मॅरीगोल्ड सोसायटीमध्ये 29 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

लिफ्टमधून बाहेर पडताना चावला

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, हा तरुण लिफ्टमधून बाहेर पडताच जर्मन शेफर्ड कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. तरुणावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नरेंद्र पेरियार असे पीडित तरुणाचे नाव आहे. सोशल मीडियावर लोक कुत्र्याच्या मालकावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

लिफ्टमधील मुलाला कुत्रा चावला

​​​​​​​गाझियाबादमधील एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये 7 सप्टेंबर रोजी एका मुलाला पाळीव कुत्र्याने चावा घेतला होता. मुल लिफ्टमध्ये रडत राहिले, वेदनेने ओरडत होते, पण कुत्र्याची मालकिन शांतपणे पाहत उभी होती. राजनगर एक्स्टेंशनमधील या घटनेनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. लिफ्टमधील पाळीव कुत्र्यांची वाहतूक बंद करावी, असे सोसायटीतील रहिवाशांचे म्हणणे होते.

सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. एक 9 वर्षांचा मुलगा ट्युशनचा अभ्यास करून घरी परतत होता. लिफ्टमधून फ्लॅटकडे जात असताना एक महिला आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन लिफ्टमध्ये शिरली. कुत्र्यापासून वाचण्यासाठी मुल लिफ्टमध्ये गेटच्या दिशेने आले. यादरम्यान कुत्र्याने त्यांच्या मांडीला चावा घेतला होता.

पिट बुलने घेतला मुलाला चावा

प्रकरण 3 सप्टेंबरचे आहे. गाझियाबादमध्ये 11 वर्षांचा मुलगा त्याच्या घराजवळ खेळत असताना त्याला पिट बुल कुत्र्याने चावा घेतला. कुत्र्याने मुलाला इतके चावले की त्याच्या चेहऱ्याला 200 टाके पडले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाले आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, एक महिला पार्कमध्ये कुत्र्यासोबत फिरताना दिसत आहे. अचानक कुत्रा त्याच्या हातातून सुटतो आणि मुलाचा चावतो. एक तरुण येऊन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करताना व्हिडिओमध्ये दिसते.

मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली होती. यानंतर परवाना किंवा नोंदणीशिवाय कुत्रा पाळल्याप्रकरणी महिलेला 5 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्याचवेळी या घटनेबाबत लोकांनी एकच गोंधळ घातला. ते म्हणाले की, मुले उद्यानात खेळतात. या ठिकाणी कुत्रे फिरू नयेत.

बातम्या आणखी आहेत...