आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई विमानतळाजवळी ड्रॅगन फ्लाय क्लबवर पोलिसांनी सोमवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास धाड टाकली. क्रिकेटपटू सुरेश रैनासह 27 सेलेब्रिटी आणि 7 स्टाफ मेंबर्सविरोधात IPC च्या 188, 269 आणि 34 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यावेळी क्लबमध्ये ऋतिक रोशनची पहिली पत्नी सुजैन आणि गायक गुरु रंधावासह अनेक सेलिब्रिटीज उपस्थित होते. या सेलिब्रिटींना अटक केल्यानंतर सोडूनही देण्यात आले.
या धाडीदरम्यान रॅपर बादशाह देखील उपस्थित होता, मात्र पोलिसांची धाड पडताच त्याने मागच्या दरवाज्याने पळ काढला. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यालाही नोटीस पाठवली आहे.
रैनाचे स्पष्टीकरण - नकळत चूक झाली
सुरेश रैनाच्या टीमने रैनाच्या वतीने निवेदन जारी केले आहे. रैना एका शूटसाठी मुंबईत आला होता, ते शूट रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दिल्लीला येण्याआधी त्याच्या एका मित्राने त्याला जेवणासाठी आमंत्रित केले होते. त्याला सध्याच्या वेळेची मर्यादा आणि प्रोटोकॉलची माहिती नव्हती. माहिती मिळाल्यानंतर त्याने नियमावली पाळली. जे घडले ते दुर्दैवी आहे आणि नकळत घडलेल्या त्या घटनेचा त्याला पश्चाताप होत आहे. तो नेहमीच कायद्याचे पालन करतो आणि भविष्यात पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घेईल.
गुरु रंधावा म्हणाला - नियमांची माहिती नव्हती
गुरू रंधावाच्या व्यवस्थापकीय टीमने म्हटले की, काल रात्रीच्या या घटनेबद्दल खेद वाटतो. दुर्दैवाने गुरु रंधावा यांना स्थानिक प्रशासनाच्या निर्णयाची माहिती नव्हती. सरकारच्या सर्व मार्गदर्शक सूचना व प्रोटोकॉलचे पालन करेल असे त्याने आश्वासन दिले आहे. तो कायद्याचे पालन करणारा माणूस आहे आणि पुढेही असे करत राहील.'
नियमाविरुद्ध सुरू होती पार्टी, यामुळे धाड टाकली
सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले की, कोरोना लक्षात घेता सरकारने निर्णय घेतला आहे की निर्धारित वेळानंतर नाईट पार्टी, पब, बार आणि हॉटेल बंद ठेवण्यात येतील. यानंतर क्लबमध्ये सुरू असलेल्या पार्टीची माहिती मिळाली आणि डीसीपी राजीव जैनच्या नेतृत्वात एका टीमला धाड टाकण्यासाठी तेथे पाठवले. कारवाईत 34 लोकांना ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान क्लबकडून कोणतेही स्पष्टीकरण समोर आले नाही. इतरही अनेक जणांनी पळ काढल्याचा पोलिसांना संशय आहे. यासाठी सीसीटीव्ही फूटेत तपासले जात आहेत. त्या लोकांना नोटीस पाठवण्यात येईल. आयपीसीच्या कलम 188 अंतर्गत एक महिन्याचा तुरूंगवास आणि 10,000 रुपये दंड होऊ शकतो.
कोरोनामुळे राज्यात रात्री 11 वाजेनंतर संचारबंदी लागू आहे
राज्यात सध्या लॉकडाउनचे नियम जारी आहेत. यानुसार रात्री 11 वाजेनंतर कोणत्याही प्रकारची पार्टी किंवा सार्वजनिक आयोजनावर बंदी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेडब्ल्यू मॅरियट स्थित ड्रॅगन फ्लाय क्लबवर डीसीपी जैन, पीआय यादव (गोडवी पोलिस स्टेशन) यांच्या पथकाने छापा टाकला. या पार्टीत 19 लोक दिल्लीहून आले होते. इतर लोक पंजाब आणि दक्षिण मुंबईतील रहिवासी होते. यातील बहुतांश लोक नशेत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.