आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्ज लपवण्याचा VIDEO:सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपवून क्रूझवर पार्टीत गेली होती मुनमुन धामिचा, NCB ने जारी केला रेडचा व्हिडिओ

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील क्रूझ रेव्ह पार्टीमध्ये पकडलेल्या आरोपीने ड्ग्ज लपवण्यासाठी अत्यंत सुरक्षित पद्धती अवलंबल्या होत्या. तरुणांनी शूजमध्ये तर तरुणींनी सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपवून आणले होते. एनसीबीने शनिवारी एक व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्जच्या गोळ्या लपवलेल्या दिसताहेत. तपास संस्थेच्या मते, 'कॉर्डेलिया द इम्प्रेस' क्रूझवरून पकडलेला आरोपी मुनमुन धामिचा हीने अशा प्रकारे ड्रग्ज लपवले होते.

एनसीबीने सांगितले आहे की, हा मुनमुनच्या खोलीतून जप्तीचा व्हिडिओ आहे आणि तो क्रूझवर झडतीच्या वेळी बनवण्यात आला होता. एनसीबीने मुनमुनविरोधात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 (सी), 20 (बी), 27 आणि 35 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ती सध्या न्यायालयीन कोठडीत तुरुंगात आहे.

मॉडेल मुनमुन धामिचा हाय प्रोफाइल पार्ट्यांमध्ये दिसत असते.
मॉडेल मुनमुन धामिचा हाय प्रोफाइल पार्ट्यांमध्ये दिसत असते.

मॉडेल आहे ड्रग्ज पार्टीत अडकलेली मुनमुन
एनसीबीला दिल्लीच्या मुनमुन धामिचाकडून ड्रग्ज मिळाली आहेत, जीला ड्रग्स प्रकरणात आर्यन खानसह अटक करण्यात आली होती. मुनमुन एक मॉडेल आहे आणि बऱ्याचदा पार्टीजमध्ये दिसते. तिला गुरु रंधावा, सुयश राय आणि अर्जुन रामपाल सारख्या सेलिब्रिटींसोबत अनेक ठिकाणी पाहिले गेले आहे.

मध्य प्रदेशातील सागरची राहणारी आहे मुनमुन
मुनमुन ही मूळचे मध्य प्रदेशातील सागरची आहे. तिचे शालेय शिक्षणही सागरमध्ये झाले आणि ती उच्च शिक्षणासाठी भोपाळला गेली. मात्र, आता तिच्या कुटुंबातील कोणीही सदस्य सागरमध्ये राहत नाही. मुनमुनच्या वडिलांचे अनेक वर्षांपूर्वी आणि आईचे गेल्या वर्षी निधन झाले. ती 2014 पासून तिच्या भावासोबत दिल्लीत राहते. तो एका खासगी कंपनीत मोठ्या पदावर काम करतो.

मुनमुन ही मूळची मध्य प्रदेशातील सागरची आहे.
मुनमुन ही मूळची मध्य प्रदेशातील सागरची आहे.

मुनमुनचे सोशल मीडियावर 11 हजार फॉलोअर्स
मुनमुनने आपल्या सोशल मीडिया पेजवर शूटिंग स्टुडिओ आणि फोटोशूटमधील फोटोही शेअर केले आहेत. मुनमुनचे इन्स्टाग्रामवर सुमारे 11,000 फॉलोअर्स आहेत आणि तिने तिच्या मॉडेलिंग शूटचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.

मुनमुन धामिचा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि तिचे 11 हजार फॉलोअर्स आहेत.
मुनमुन धामिचा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि तिचे 11 हजार फॉलोअर्स आहेत.

हायप्रोफाइल लोक क्रूजवर ड्रग्ज लपवून घेऊन गेले होते
या प्रकरणात, एनसीबीने पहिल्याच दिवशी भीती व्यक्त केली होती की हाय-प्रोफाईल लोकांनी त्यांच्या अंडरगारमेंट्समध्ये ड्रग्ज लपवून नेले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूझवर जात असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये सामील असलेल्या लोकांनी ड्रग्ज त्यांच्या पँटच्या शिलाईमध्ये, महिलांच्या पर्सच्या हँडलमध्ये, अंडरवेअरच्या सीलाईच्या भागामध्ये आणि शिलाईमध्ये लपवून ड्रग्ज घेऊन गेले होते.

बातम्या आणखी आहेत...