आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईमध्ये नॉरकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने अंधेरीच्या लोखंडवाला परिसरातून एका ड्रग पेडलरला ताब्यात घेतले आहे. याने लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी आपले नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या वडिलांच्या नावावरुन ठेवले होते. लोक त्याला 'इब्राहिम कासकर' म्हणायचे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी NCB च्या एका पथकाने लोखंडवालातील एका फ्लॅटमध्ये रेड मारली आणि इब्राहिम मुजावर उर्फ इब्राहिम कासकरला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 10 लाख रुपये किमतीचे 100 ग्राम मेफेड्रोन ड्रग जप्त करण्यात आले. मुजावरला, दाऊदच्या नावाचा वापर करुन दहशत पसरवायची होती.
मर्सडीज कारमधून ड्रग सप्लाय करायचा
NCB ने आरोपीकडून एक मर्सिडीज कार जप्त केली आहे. याच कारमधून तो हाय प्रोफाइल ग्राहकांना ड्रग सप्लाय करायचा. मुजावरने NCB ला सांगितले की, त्याच्याकडून जप्त केलेली मेफेड्रोन ड्रग त्याला साउथ मुंबईतील डोंगरीमध्ये राहणाऱ्या आसिफ राजकोटवालाने दिली आहे.
आजही सुरू राहणा NCB ची छापेमारी
NCB ने तात्काळ कारवाई करत रविवारी आसिफला अटक केली. आसिफकडून पोलिसांनी हशीश जप्त केली आहे. मुजावरच्या अटकेनंतर NCB ने डोंगरी साउथ मुंबईमध्ये तीन जागेवर छापेमारी केली. आज(सोमवारी) देखील मुजावरने सांगितलेल्या ठिकाणांवर NCB छापेमारी करणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.