आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाब मलिकांचा नवीन खुलासा:काशिफ खानची चौकशी का झाली नाही? काशिफ आणि समीर दाऊद वानखेडे यांच्यात काय संबंध? चॅट उघड करून मलिकांचा सवाल

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एक ट्विट करत एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. आज मलिकांना सोशल मीडियावर व्हॉट्सअ‍ॅप संभाषणाचे स्क्रीनशॉट शेअर केले असून, “के.पी. गोसावी आणि खबऱ्यामधले हे चॅट्स आहेत. यामध्ये काशिफ खानचा उल्लेखही करण्यात आलेला आहे. मग काशिफ खानची चौकशी का झाली नाही? काशिफ खान आणि समीर दाऊद वानखेडे यांच्यात काय संबंध आहे?" असा सवाल मलिकांनी उपस्थित केला आहे.

पुढे मलिक म्हणाले की, "यावरून असे स्पष्ट होते की, कशाप्रकारे कॉर्डेलिया क्रूझ पार्टीला हजेरी लावणाऱ्या लोकांना अडकवण्याची तयारी सुरू होती. ही समीर दाऊद वानखेडेंची खासगी सेना आहे. त्यामुळे त्यांना आता बऱ्याच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहे." असा आरोप मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावर लावला आहे.

काशिफ खान दोन दिवस क्रूझवर काय करत होता
"व्हाईट दुबई नावाचा एक व्यक्ती आहे. त्याची माहिती या चॅटमधून दिली जात आहे. केपी गोसावी फोटो पाठवायला सांगतात. त्यानंतर काशिफ खानचा फोटो पाठवला जातो. ज्या प्रमाणे फोटोच्या आधारे लोकांना ओळख करून ताब्यात घेतले गेले. त्याच पद्धतीने काशिफ खानला अटक का करण्यात आली नाही? त्याला सेफ पॅसेज का दिला? तो क्रुझवर दोन दिवस काय करत होता?" असे मलिक म्हणाले.

काशिफला वाचवण्याचे प्रयत्न
काशिफ खान आणि वानखेडे यांचे काय संबंध आहेत? त्याची माहिती एनसीबीने द्यावी. काशीफवर देशभरात गुन्हे दाखल आहेत. चार दिवसांपूर्वी त्याच्यावर फसवणुकीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला का वाचवले जात आहे हे एनसीबीने सांगावे. न्यायालयाने त्याला फरार घोषित केले आहे. तरीही त्याला का वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत? असा सवालही मलिकांनी उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...