आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरणात फसवणूक:मुंबईमध्ये 390 लोकांना फेक इंजेक्शन देणाऱ्या रॅकेटचे 4 लोक ताब्यात, मास्टरमाइंड निघाला 10 वी नापास; 9 ठिकाणी लावले कँप

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 30 मेला हीरानंदानीमध्ये लावण्यात आला होता कँप

मुंबईच्या हीरानंदानी सोसायटीमध्ये बनावट व्हॅक्सीनेशन ड्राइव्ह चालवून 390 लोकांना इंजेक्शन देणाऱ्या 4 आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये एका मोठ्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. या फसवणुकीचा मास्टरमाइंड 10 वी नापास व्यक्ती आहे. लसींचा जुगाड करणे आणि कँपची जबाबदारी सांभाळण्याचे काम त्याच्या खांद्यावरच होते. ज्या लोकांना पकडण्यात आले आहे, त्यामध्ये एक व्यक्ती मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. त्याने MP च्या सतना येथून लसींचा पुरवठा केला होता.

तपासात समोर आले आहे की, आरोपींनी 9 सोसायटीजमध्ये अशा प्रकारचेच बनावट लसीकरण कँप लावले होते. लस दिल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला ताप किंवा थकव्याचे लक्षण दिसले नसल्याने त्यांना संशय आला. यानंतर सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

सील तुटलेली व्हॅक्सीन, नकली सर्टिफिकेट
मुंबईचे अॅडिशनल पोलिस कमिश्नर दिलीप सावंत यांनी म्हटले की, या व्हॅक्सीनेशन ड्राइव्हचे आयोजन सरकार किंवा BMC कडून करण्यात आलेले नव्हते. आतापर्यंत यांनी कोणत्याही अधिकृत सोर्सकडून व्हॅक्सीन खरेदी केल्याचे पुरावेही मिळालेले नाही. तपासात समोर आले आहे की, लोकांना जी व्हॅक्सीन देण्यात आली, त्याचे सील पहिलेच तुटलेले होते. लोकांना जे सर्टिफिकेट देण्यात आले दे तेखील फेक होते आणि ते हॉस्पिटलचे आयडी चोरून तयार करण्यात आले होते याचे पुरावे मिळाले आहेत.

10 वी नापास व्यक्ती आहे मास्टरमाइंड
सावंत यांनी सांगितले की, या संपूर्ण खेळाचा सूत्रधार 10 नापास व्यक्ती आहे. तो 17 वर्षांपासून मेडिकल फील्डमध्ये काम करत होता. आतापर्यंत या प्रकरणामध्ये एकूण चार लोकांना अटक झाली आहे. यामध्ये इतर काही रडारवर आहेत. ज्यावेळी हे बनावट लसीकरण ड्राइव्ह सुरू होते, तेथे कोणताही क्वालिफाइड डॉक्टर उपस्थित नव्हता. अजून एका मुलाला मध्यप्रदेशच्या सताना येथून पकडण्यात आले आहे. 9 इतर ठिकाणी पोलिस तपासासाठी जाणार आहे.

भाजप नेत्याने केली कारवाईची मागणी
दुसरीकडे भाजपचे नेता किरीट सोमय्या म्हणाले की, व्हॅक्सीनेशन घोटाळ्यामध्ये बीएमसीचे लोक सामिल आहेत. कांदिवली प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. बोग आधार कार्ड बनवून 18 ते 22 वर्षांपर्यंतच्या लोकांचे लसीकरण करण्यात आले. आरोपींवर कठोर कारवाई व्हायला हवी.

30 मेला हीरानंदानीमध्ये लावण्यात आला होता कँप
यापूर्वी सोसायटीमध्ये राहणाऱ्या हितेश पटेलने सांगितले होते की, 30 मेला हीरानंदानी हाउसिंग सोसायटी परिसरात 390 लोकांना कोवीशील्डचा डोस देण्यात आला. प्रत्येक डोससाठी 1,260 रुपये घेण्यात आले. सोसायटीकडून एकूण 4 लाख 91 हजार 400 रुपये देण्यात आले. त्यांनी सांगितले की, राजेश पांडे नावाच्या एका व्यक्तीने स्वतःला कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाचा प्रतिनिधी असल्याचे सांगत सोसायटी कमिटीच्या सदस्यांसोबत संपर्क साधला होता. या अभियानाचे संचालन संजय गुप्ता यांनी केले, तर महेंद्र सिंह नावाच्या व्यक्तीने सोसायटीच्या सदस्यांकडून पैसे घेतले होते.

मॅसेजही आला नाही आणि फोटोही घेऊ दिला नाही
पाटील पुढे म्हणाले की, लस घेतल्यानंतर आम्हाला आमच्या मोबाइलवर कोणत्याही प्रकारचा मेसेज आला नाही. या व्यतिरिक्त, आम्हाला लस घेताना सेल्फी किंवा फोटो घेण्यास परवानगी नव्हती. सोसायटीचे आणखी एक सदस्य ऋषभ कामदार म्हणाले की, लस घेतल्यानंतर कोणालाही रिसीव्ड किंवा प्रमाणपत्रही देण्यात आले नाही. 10-15 दिवसांनंतर प्रमाणपत्र आले तर ते वेगवेगळ्या रुग्णालय जसे की, नानावटी, लाइफ लाइन, नेस्को बीएमसी लसीकरण केंद्राकडून जारी करण्यात आले होते. या प्रकरणी संबंधीत रुग्णालयांशी संपर्क केला तर त्यांनी सोसायटीला लसी उपलब्ध करण्यापासून नकार दिला.

बातम्या आणखी आहेत...