आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईत पुन्हा एका गगनचुंबी इमारतीला आग लागली आहे. लालबागमध्ये ही घटना घडलीय. येथील वन अविघ्न इमारतीच्या 35 व्या मजल्यात आगडोंब उसळला आहे.
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्यात. सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरूयत. इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना काढण्यात येतेय.
अशी आहे घटना
मुंबईतल्या लालबाग परिसरात वन अविघ्न ही इमारत आहे. सकाळी पावणे अकराच्या सुमारास या इमारतीत आग लागली. आग कशामुळे लागली हे अजून तरी समोर आले नाही. मात्र, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्यात. त्यांनी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केलेत. या घटनेत अजून तरी कसलिही जीवित हानी झाल्याचे समोर नाही.
गेल्या वर्षीही आग
वन अविघ्न इमारतीला गेल्या वर्षीही आग लागली होती. गेल्या वर्षी 19 वा मजला पेटला होता. त्यामुळे मुंबईतल्या गगनचुंबी इमारतीमधील सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता. आता पुन्हा त्याच इमारतीमध्ये आग लागल्याने हा प्रश्न किती गंभीर आहे, त्याचाच प्रत्यय येतोय. दरम्यान, सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्यात. त्यांनी इमारतीमध्ये अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केलेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.