आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत 23 मजली इमारतीत आग VIDEO:घटनेत 8 जण जखमी, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी नाही, कारणाचा शोध सुरू

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतल्या 23 मजल्या इमारतीत आज आग लागलीय. सकाळी अकराच्या सुमारास मालाड पश्चिमधल्या शिवडी परिसरातल्या उपनगरात ही घटना घडली. यात जण जखमी झाले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे.

आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या पथकाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले.

अशी घडली घटना

शिवडी परिसरातल्या जनकल्याण नगर येथील मरिना एन्क्लेव्ह या 22 मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडलीय. सकाळी अकरा वाजून चार मिनिटांनी ही आग लागली. सकाळी सव्वाअकरापर्यंत ही आग विझवण्यात आली. या घटनेत आठ जण जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते.

शिडी लावून काढले

तिसऱ्या मजल्यावर आग लागली. साधारणतः सकाळीअकराच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर एकच पळापळ सुरू झाली. अनेकजण तिसऱ्या मजल्यावर अडकले होते. ही माहिती अग्निशमन दलाच्या पथकाला समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शिडी लावून अनेकांना उतरवले. आगीच्या भीतीने एक तरुण खिडकीतून उतरून इमारतीच्या बाहेर आला. त्यालाही अग्निशमन दलाच्या पथकाने सुखरूपपणे खाली उतरवले.

आगीच्या कारणाचा शोध

मालाड पश्चिममधल्या इमारतीत आग कशामुळे लागली, हे समोर आले नाही. आगीच्या कारणाचा तपास सुरू करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वतीने देण्यात आलीय. पाच गाड्यांनी ही आग विझवण्यात आली. आतापर्यंत कसलिही जीवितहानी झाली नसल्याचेही सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...