आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या ओशिवरा परिसरात आग आटोक्यात:फर्निचर मार्केटला लागलेल्या आगीत 20 ते 25 दुकाने जळून खाक

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील जोगेश्वरी (पश्चिम) भागातील ओशिवरा परिसरातील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग आटोक्यात आली आहे. घास कम्पाऊंडमधील फर्निचर गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात आली आहे. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून फायर कूलिंगचे काम सुरू आहे. आग आटोक्यात आली असली तर यात तब्बल 20 ते 25 फर्निचरची दुकाने जळून खाक झाली आहेत. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही

आगीमुळे परिसरात धुराचे लाेट पसरले. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल 12 ते 14 गाड्यांचा ताफा घटनास्थळावर पोहोचला होता. तब्बल दीड तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

ओशिवरातील फर्निचर मार्केटमध्ये ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. मुख्य रस्त्यावरच ही आगीची घटना घडली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी झाल्याचे पाहायला मिळत आहे. वाहतूक पोलिसांनी आता एस व्ही रोड वाहतुकीसाठी बंद केला आहे.

बातम्या आणखी आहेत...