आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटकोपरच्या पारेख हॉस्पिटल लगतच्या इमारतीला भीषण आग:22 जणांना हलवले; एकाचा मृत्यू; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या दाखल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • l

मुंबईतील घाटकोपरमधील पारख हॉस्पिटलच्या लगतच्या इमारतीला भीषण आग लागली आहे.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून अग्नितांडवामध्ये एका जणांचा मृत्यू झाला आहे.

अग्निशमन दलाची प्राथमिक माहिती

रुग्णांलयाच्या लगतच्या इमारतीमध्ये असलेल्या हॉटेलमध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. खबरदारी म्हणून काही रुग्णांना इतर रूग्णालयात हलविण्यात आलं आहे. तर अजूनही काही रुग्ण हे हॉस्पिटमध्येच अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?

पारेख रूग्णालयाच्या बाजूच्या हॉटेल असलेल्या इमारतीला ही आग लागली आहे. या भीषण आगीत अनेक जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. आत्तापर्यंत आगीतील 22 जणांना इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत.....

बातम्या आणखी आहेत...