आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूझ ड्रग्स पार्टीमध्ये भास्कर इन्वेस्टिगेशन:कॉर्डेलिया भारतीय सागरी सीमेत बेकायदेशीरपणे ऑपरेट होत होते, क्रूझवरील पार्टीला परवानगीही नव्हती; IRCTC ने कांट्रेक्ट रिव्ह्यू सुरू केला

मुंबई (विनोद यादव, मनिषा भल्ला)15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्रूझने कोविडचे नियम मोडल्याचा आरोप

NCB ने कॉर्डेलिया क्रूजवर केलेल्या छापेमारीनंतर मुंबई आणि गोवा दरम्यान चालणारे मोठे क्रूझ वादात सापडले आहे. आता या जहाजाबद्दल एक नवीन खुलासा झाला आहे की ते भारतीय सागरी सीमेमध्ये बेकायदेशीरपणे कार्यरत होते. विशेष गोष्ट म्हणजे या जहाजाचा करार IRCTC आणि बुक माय शो (BMS) सारख्या नामांकित कंपन्यांकडे होता. आता प्रश्न उद्भवत आहे की क्रूझ पूर्ण परवानगीशिवाय कसे चालत होते. या क्रूझ लाइनरवर एकाच वेळी 2000 लोक प्रवास करू शकतात.

डीजी शिपिंग अमिताभ कुमार यांनी म्हटले आहे की क्रूझ लाइनर कॉर्डेलियाने भारतीय समुद्रात काम करण्याची विनंती केली होती, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना परवानगी देण्यात आली नाही. उपमहासंचालक आयश मोहम्मद यांनी याच प्रकरणामध्ये सांगितले की, आता आम्ही कॉर्डेलिया क्रूझवर कारवाई करण्याचा विचार करत आहोत, कारण व्यापारी जहाजबांधणी कायद्याच्या कलम 406 नुसार कोणत्याही जहाजाला किंवा शिपला भारतीय समुद्री सीमे ऑपरेट करण्यासाठी परवाना घेणे खूप आवश्यक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन रेल्वे टूरजम अँड केटरिंग कॉर्पोरेशन (IRCTC)ने क्रूझ पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रथमच तिकीट बुकिंग सुरू केली होती. यासाठी IRCTC ने कॉर्डेलिया नावाच्या विदेशी क्रूझ लाइनरशी करार केला होता. आता ही माहिती समोर येत आहे की या वादानंतर IRCTC या जहाजाशी केलेल्या करारावर पुनर्विचार करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,IRCTC कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी NCB च्या चार्जशीटची वाट पाहणार आहे आणि जर क्रूझची या पार्टीशी लिंक मिळाली तर तो करारही मोडू शकतो.

IRCTC ने सांगितले- आमचे फक्त तिकीट बुकिंगचे काम आहे
IRCTC ने म्हटले आहे की, त्यांच्या वतीने केवळ तिकीट बुकिंग केले जाते आणि या आधारावर कमिशन शेअर केले जाते. जहाजाच्या ऑपरेशनशी त्यांचा काहीही संबंध नाही. IRCTC ने स्पष्ट केले आहे की बुकिंग त्यांच्या वेबसाइटद्वारे केले गेले असेल, परंतु या परिस्थितीत जबाबदारी प्रवाशांची आहे. या क्रूझसाठी IRCTC जी बुकिंग केली होती, त्याची पहिली ट्रिप 18 सप्टेंबर रोजी मुंबईहून निघाली होती.

क्रूझवरील पार्टीची पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली नाही
तपासात हे देखील समोर आले आहे की, छाप्या दरम्यान सुरु असलेल्या पार्टीची कोणतीही परवानगी मुंबई पोलिसांकडून घेण्यात आली नव्हती. हे पत्र किंवा कोणतीही माहिती मुंबई पोलिसांशी शेअर केलेली नव्हती. परवानगी देण्याबाबत मुंबई पोलिस आता डीजी शिपिंग आणि एमबीपीटी अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास मुंबईच्या यलो गेट पोलिस स्टेशनच्या टीमने सुरू केला आहे आणि लवकरच त्यावर मोठी कारवाई होऊ शकते.

क्रूझने कोविडचे नियम मोडल्याचा आरोप
कोरोना महामारी दरम्यान लागू केलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा महाराष्ट्रात लागू आहे. या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी मास्कशिवाय जाणे आणि दोन फूट अंतर नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, क्रूझवर रिलीज झालेल्या पार्टीच्या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट आहे की, असा कोणताही नियम इथे उपस्थित लोकांनी पाळला नव्हता. त्यामुळे आता क्रूजवर आणखी काही गुन्हे दाखल होऊ शकतात.

मुंबईहून या ठिकाणी करु शकता क्रूझची यात्रा
हे क्रूझ मुंबई ते गोवा, लक्षद्वीप आणि कोचीसाठी बुक केली जात आहे. कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन 2022 मध्ये परदेश दौरा सुरू केला जाईल. क्रूझमध्ये रेस्टॉरंट, बार, ओपन सिनेमा, चिल्ड्रेन प्ले एरिया आणि जिम यासारख्या सुविधा आहेत.

एनसीबीने 8 जणांना अटक केली आणि क्रूझमधून 8 जणांना ताब्यात घेतले
एनसीबीने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 8 जणांना या क्रूझवरून अटक केली आहे आणि क्रूझच्या 8 कर्मचाऱ्यांना सोमवारी ताब्यात घेण्यात आले. यापैकी अनेकांना आज अटक झाल्याचे दाखवले जाऊ शकते. आता या प्रकरणाबाबत एक नवीन खुलासा समोर आला आहे की या जहाजाला भारतीय समुद्र सीमेवर प्रवास करण्याची परवानगी नव्हती.

बातम्या आणखी आहेत...