आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा चर्चेत कॉर्डेलिया क्रूझ:एक क्रू मेंबर कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर 2016 लोक जहाजावर अडकले, सर्वांच्या टेस्ट रिपोर्टची प्रतिक्षा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आर्यन खानच्या अटकेनंतर वादात सापडलेले कॉर्डेलिया क्रूझ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळचे कारण हे कोरोनाचा संसर्ग हे आहे. क्रूझमधील क्रू मेंबरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आता सर्व 2000 प्रवासी आणि जहाजावरील 16 क्रू मेंबर्सची RT-PCR चाचणी केली जात आहे. हे सर्वजण जहाजातच अडकून पडले आहेत.

कॉर्डेलिया क्रूझ हे गोव्याहून मुंबईला निघाले होते. सध्या ते गोव्यातील मुरगाव बंदर क्रूझ टर्मिनलजवळ आहे. आता तेथील सरकारने या जहाजाला डॉक करण्यास परवानगी नाकारली आहे.

रिपोर्ट येईपर्यंत जहाजात रहावे लागेल
पॉझिटिव्ह क्रू मेंबरला जहाजामध्येच आयसोलेट केले गेले आहे. अधिकाऱ्यांनी सख्त निर्देश दिले आहे की, RT-PCR टेस्टचा रिपोर्ट येण्यापूर्वी कोणीही जहाजेमधून उतरणार नाही.

याआधीही क्रूझवर कोविडचे नियम तोडण्यात आले होते
कोरोना महामारीच्या काळात लागू करण्यात आलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा महाराष्ट्रात लागू आहे. याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता जाणे आणि दोन फूट अंतर राखणे हे नियम पाळणे बंधनकारक आहे. मात्र, आर्यन खानच्या अटकेनंतर क्रूझवर झालेल्या पार्टीच्या व्हिडिओमध्ये येथे उपस्थित असलेल्या लोकांनी असा कोणताही नियम पाळला नसल्याचे स्पष्ट झाले होते.

मुंबईहून या ठिकाणी तुम्ही करु शकता क्रूझचा प्रवास
हे क्रूझ मुंबई ते गोवा, लक्षद्वीप आणि कोचीसाठी बुक केले जात आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन 2022 मध्ये परदेश दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या क्रुझमध्ये रेस्टॉरंट, बार, ओपन सिनेमा, मुलांसाठी खेळण्याची जागा आणि जिम अशा सुविधा आहेत.

बातम्या आणखी आहेत...