आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक-कारच्या धडकेत तीघांचा मृत्यू, नाशिकमध्ये एसटीच्या भीषण अपघातात एक महिला ठार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-गोवा महामार्गावर माणगावमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. यात कारमधील तीघांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन लहान नातवांसह आजीचाही समावेश आहे.

रिवान दर्शन तावडे (वय वर्षे 3), रित्या दर्शन तावडे ( वय 6 महिने) आणि वैशाली विजय तावडे (वय वर्ष 72) अशी मृतांची नाव आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरली माणगाव तालुक्यातील कशेणे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. बोरीवलीचे राहणारे हे कुटुंब कोकणात देवगड येथे जात होते. यावेळी हा अपघात झाला.

नाशिकमध्ये भीषण अपघात

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले. या अपघातात महिला वाहकाचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील 20 ते 22 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

सारिका लहिरे या महिला कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला तर एका महिला प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कसा झाला अपघात?

समोरुन येणाऱ्या वाहनाने कट मारल्यानंतर एसटीचा रॉड तुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि एसटी बस थेट समोरील झाडावर आदळून अपघात झाला.

अपघात एवढा भीषण होता की, बसचा चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात महिला बस कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला. तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.